जर आपले पण वजन कमी होत असेल तर होऊ शकतो थायरॉईड…जाणून घ्या काय आहेत थायरॉईडची लक्षणे…अन्यथा

थोडीशी काळजी आणि नियमित तपासणी या दोन उपायांनी आपण थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळू शकतो. हा त्रास विशेषतः महिलांना अधिक होत असल्याने त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती चाचणी जरूर करून घ्यायला हवी…

तुमच्या कुटुंबातील कोणी अचानक वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्याने ग्रस्त आहे का, तर कदाचित ही समस्या थायरॉइडच्या विकारांमुळे उद्भवलेली असू शकते. अत्यंत सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमागे थायरॉइडचे विकार असण्याची शक्यता असून धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना याची पुसटशी कल्पनाही नसते.

आठपैकी एका भारतीय महिलेला या समस्यांना सामोरे जावे लागते. जवळपास ६० टक्के व्यक्तींना आपल्याला थायरॉइडशी संबंधित विकार आहे, याविषयी माहिती नसते. थायरॉइडशी संबंधित काही विकार आणि त्यांच्या सामान्य लक्षणांविषयी आपण जाणून घेऊ…

टोकन फोटो

हायपोथायरॉइडिझम:-

थायरॉइड हॉर्मोन्सचे रक्तातील स्राव कमी झाल्यावर हा विकार उद्भवतो. वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे आदी प्रमुख लक्षणे या विकारात आढळून येतात. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटींग हॉर्मोन अर्थात टीएसएच तपासणी. हॉर्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.•

हायपरथायरॉइडिझमशरीराला कंप सुटणे, दरदरून घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थायरॉइड ग्रंथीची वाढ ही लक्षणे हायपरथायरॉइडिझमची असू शकतात. या विकाराची पडताळणी करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करण्यात येतात.

गलगंड

थायरॉइड ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ म्हणजे गलगंड. हायपो किंवा हायपर थायरॉइडिझममध्ये ही स्थिती येऊ शकते. तसेच, आयोडिनची मात्रा कमी झाल्यानेही गलगंड होतो. गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणाऱ्या बाळात थायरॉइड ग्रंथीशी समस्या आढळू शकतात. अनेक प्रगत देशांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बाळाची हायपोथायरॉइडिझमची तपासणी करण्यात येते.

टोकन फोटो

थायरॉइड नोड्यूल्स

ग्रंथींमध्ये गाठी आल्याने हा विकार उद्भवतो. एमआरआय किंवा तत्सम तपासण्यांची याची चाचपण करण्यात येते. गाठ आलेल्या दहा टक्के पेशंटमध्ये ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता असते. उर्वरित पेशंटमध्ये या गाठींवर उपचार किंवा सर्जरी करून काढून टाकता येते.

प्रतिबंधात्मक उपाय

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला ही त्रिसूत्री आहे.

चौरस आहारः थायरॉईड समस्येची कुठलीही पार्श्वभूमी नसलेले चौरस आहाराच्या माध्यमातून या विकारांपासून दूर राहू शकतात. आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवनः या दोन्ही पदार्थांमुळे चौरस आहारात बाधा येऊ शकते. तसेच वजन वाढवण्यासाठीही हे कारणीभूत ठरतात. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

प्रतीकात्मक चित्र

वैद्यकीय सल्लाः थायरॉइड विकाराशी संबंधित कुठलीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन वाढणे-कमी होणे, केस गळणे अशा विकारांसाठी स्वतःच्या मर्जीने औषधोपचार न करता वैद्यकीय तपासणी करावी. टीएसएच चाचणी थायरॉइड विकाराची अचूक माहिती देते.

प्रत्येक वर्षाला थायरॉइडची तपासणी ही सर्वांनाच लाभकारक ठरू शकते. अनेक हॉस्पिटल्स आणि लॅबरोटरीजमध्ये या चाचण्या उपलब्ध आहेत. परंतु, कोणत्या चाचण्या कराव्यात,

याचा नेमका सल्ला डॉक्टरांकडूनच घ्यावा. शरीराच्या जवळपास सर्व कामगिरीवर परिणाम करणारी थायरॉइड ग्रंथी कार्यक्षम राहणे अतिशय महत्त्वाचे असते. योग्य माहिती, शरीराचे बारकाईने निरीक्षण, वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि डॉक्टरांचा सल्ला यातून आपण थायरॉईड विकार टाळू शकतो.


Posted

in

by

Tags: