आता आपण काही दिवसांतच निरोगी पद्धतीने वाढवू शकता आले वजन…फक्त त्यासाठी आपण करा हे उपाय…काही दिवसांतच आपल्याला परिणाम दिसतील

वजन वाढणं ही जशी सर्वसामान्य समस्या, तक्रार आहे. त्याचप्रमाणे वजन न वाढणं, वजन कमी असणं ही देखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा, अति बारिक असल्याचा परिणाम बाहेरील शरीरावर दिसून येतो.

त्यामुळे अनेक जण वजन न वाढल्यानेही त्रस्त आहेत. काही लोक वजन वाढण्यासाठी सप्लिमेंटचा वापर करतात मात्र सप्लिमेंट शरीरासाठी हानीकारक आहे. त्याचे साइड इफेक्ट होण्याचीही शक्यता असते. परंतु काही घरगुती, आयुर्वेदीक उपाय अशा समस्येवर अत्यंत गुणकारी ठरतात.

वसाची सुरुवात अगदी हलक्या व्यायामाने करा. योगा करा. त्यामुळे भूक वाढते. सकाळी नाश्तामध्ये दूध, तूपाचा अधिक वापर करा. जेवणात डाळी, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश करा.

यामुळे वजन वाढण्यास मदत होते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यानेही वजन वाढत नाही. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन अशा समस्या असल्यासही वजन वाढण्यास अडथळा येतो. त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळेही शरीर कमजोर होते आणि वजन वाढत नाही. कोणत्याही प्रकारची चिंता, नैराश्य, कमी झोप यामुळेही वजन वाढत नाही. वजन न वाढण्यामागे आनुवंशिकता हेदेखील कारण आहे.

आपण आपल्या आहारात ब्रेड, बटाटे, कोंबडी आणि मासे इत्यादी उच्च कॅलरीयुक्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. हे केवळ आपल्या स्नायूंनाच वाढवत नाही तर आपले हाडे मजबूत बनवते.

पोषकत्वांनी भरपूर असा आहार घ्या. वजन वाढवण्याआधी हे लक्षात घ्या तुम्हाला स्वस्थ शरीर हवयं लठ्ठपणा नकोय. त्यामुळे शरीराला उर्जा मिळेल असे अन्न घ्या.

प्रोटीनची मात्रा वाढवा. प्रोटीनयुक्त मासे,अंडी, मोड आलेले चणे, चिकन, भात, दूध आणि दुधाचे पदार्थ, मेवा, बीन्स यां पदार्थांचे आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.

वजन वाढविण्यासाठी दूध आणि दही देखील चांगले मानले जाते. दुधात प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असतात. हे आपले स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत करून आपले वजन वाढवतात.

वजन वाढण्याच्या पद्धतीत सर्वात चांगला उपाय म्हणजे हेल्दी फॅट असतं. जेव्हा तुम्ही हेल्दी फॅटची डाएट घेता तेव्हा तुमच वजन सहजपणे वाढू लागतं. हेल्दी फॅट खाल्ल्याने मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. हेल्दी फॅटसाठी तुम्ही ड्राय फ्रूट्स, हिरव्या भाज्या, अॅवोकोडाचं तेल इत्यादी पदार्थ खाऊ शकता.

जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा केवळ डाएटने भागत नाही. यासाठी तुम्हाला आवश्यक एक्सरसाइज करणेही गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हेल्दी डाएटसोबत एक्सरसाइज करता, तेव्हा मांसपेशींचा विकास होतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही काही वेगळ्या एक्सरसाइज करू शकता.

जर तुमचं वजन सामान्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या डाएटबाबत विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन, फॅट आणि व्हिटॅमिनचं प्रमाण चेक केलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या वयानुसार आवश्यक पोषक तत्त्वांचा डाएटमध्ये समावेश करा.

भरपूर झोप घ्या. दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे.


Posted

in

by

Tags: