आपण पण करता तुपाचे सेवन…तर प्रथम या गोष्टी जाणून घ्या…मगच करा तुपाचे सेवन तरच होतील आपल्याला असंख्य असे फायदे

आपल्याला माहित आहे की तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मुग डाळ खिचडी, शिरा असे अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत.
स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर मोठ्या प्रमाणत केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ, लग्नविधी अशा अनेक कार्यक्रमातील जेवणाच्या पंगतीत पाहुणचार करताना आग्रहाने तुप वाढलं जातं. तूप आपल्या आरोग्यसाठी आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासूनच आपल्या आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितला जातो.
मात्र आजकाल तुपाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. तुपामुळे आपले वजन वाढतं या कारणांमुळे अनेक जण आहारातून तुप वर्ज्य करतात. मात्र आयुर्वेद शास्त्रानुसार तुप शरीराच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते.
म्हणूनच आयुर्वेदात तुपाला सात्विक अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणून अनेक विकारांमध्ये तुपात औषधे टाकून त्याचे चाटण रुग्णाला दिले जाते. शरीरस्वास्थ निरोगी राहण्यासाठी रिकाम्यापोटी तुपाचे सेवन केल्यामुळे अथवा नाकात शुद्ध तूप टाकल्याने अनेक आजारपणे दूर ठेवता येतात.
तुपामध्ये व्हिटॅमिन् ए, डी, कॅल्शियम, फॉस्फरस मिनरल्स, पोटॅशियम, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अॅन्टी व्हायरल घटकदेखील भरपूर प्रमाणत असतात. दोन प्रकारचं तूप आपण आपल्या आहारात वापरू शकता. गाईच्या दुधापासून आणि म्हशीच्या दुधापासून असे दोन प्रकारचे तूप तयार केले जाते. या दोन्ही प्रकारच्या तुपाच्या सेवनाने शरीर बळकट आणि निरोगी होण्यास आपल्याला मदत होते.
तसेच जर रोज आपण तूप नाकात सोडले तर त्याचे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. अनेक संशोधनानुसार जर आपण नाकात झोपताना रोज तुपाचे दोन थेंब सोडले तर त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या शरीराला मिळते तसेच आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुप फायदेशीर ठरते. यासाठी नवमातांना बाळंतपणानंतर झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी, खेळाडूंना त्यांचा स्टॅमिना टिकविण्यासाठी, कुस्ती खेळणाऱ्या लोकांना तुपाचा खुराक देण्यात येतो.
आपल्या नाकात तूप टाकण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. तुपामुळे शरीराला नैसर्गिक वंगण मिळते. शिवाय तुपात ओमॅगा 3 फॅटी असतात ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
जर गायीच्या तूपाचे काही थेंब सतत नाकात सोडले तर केस गळण्याची समस्या संपेल. तसेच आपण तुपाचे सेवन केल्यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते. पचनशक्ती सुधारल्यामुळे आपल्याला वेळेत भूक लागते आणि तुम्ही अवेळी चुकीचे पदार्थ कमी खाता. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
तुपामध्ये मेंदूच्या कार्याला स्फुर्ती देण्याचे सामर्थ्य आहे. ज्यामुळे तुम्ही लवकर थकत नाही. अशक्तपणा आल्यास तुपाचा आहार वाढवावा आणि आपल्या नाकात सुद्धा तुपाचे काही थेंब सोडावेत. ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटू शकते..
डोळ्यांचे विकार:-जर आपल्याला डोळ्यांच्या समस्या असतील तर डोळ्यांमध्ये शुद्ध तूप टाकल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. शिवाय शुद्ध तुपापासून तयार केलेले काजळ डोळ्यांमध्ये लावल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
जुलाबाचा त्रास होत असेल तर सुंठ, साखर आणि तुपाचे चाटण करावे. ज्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. जुलाबामुळे पोट रिकामे होते ज्यामुळे तुम्ही डिहाड्रेट होता. मात्र तुपामुळे आतड्यांना स्निग्धता मिळते ज्यामुळे पोट दुखण्याचा त्रास कमी होतो
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी दररोज नाकात शुद्ध तेलाचे दोन थेंब टाका. त्वचेवर अॅलर्जी उठत असेल तर नाकात तूप टाकल्यामुळे ती कमी होऊ शकते. मायग्रेनच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल दररोज नाकात दोन थेंब शुद्ध तूप टाकण्याची सवय लावा.
जुने तूप पूर्वीच्या काळी युद्धात झाल्यामुळे होणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी वापरला जात असे. त्यामुळे तूप जितकं जुनं तितकं ते त्वचेसाठी उत्तम ठरतं.