काय आपले पण दात पिवळे किंवा लाल पडले आहेत…तर आजच करा हे घरगुती उपाय…काही क्षणात आपले दात हिऱ्यासारखे चमकतील

तुम्ही हसल्यानंतर पहिले दिसतात ते तुमचे दात.तुमचे दात सुंदर असतील तर तुमचे हास्य अगदी खुलून दिसते. पण तुमचे दात पिवळे असतील तर तुम्हालाही चारचौघात हसायला अगदी नकोसे होऊन जाते. तुम्हालाही तुमचे हात पिवळे झालेले दिसत असतील. तर दात पांढरे करण्याचे उपाय तुम्हाला माहीत हवेत.

तुम्हाला माहीत आहे का? दात स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी दातांचा पिवळेपणा कसा घालवावा यासाठीच आम्ही तुमच्यासोबत दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. मग जाणून घेऊया दात साफ करण्याचे उपाय.

दात पिवळे पडण्याची ही आहेत कारणं:-

प्रत्येकाच्या दातांचा शेड हा जरी वेगवेगळा असला तरी पिवळे पडलेले दात नेहमीच वेगळे दिसतात.तुमच्या दातांचा रंग तुम्हाला पिवळा वाटत असेल तर ही काही कारणं आहेत ज्यामुळे तुमचे दात पिवळे पडत आहेत. जाणून घेऊया दात पिवळे पडण्यामागील कारणे

चुकीच्या पद्धतीने दात घासणे

काही जणांना दात घासण्याचा फारच कंटाळा असतो. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करण्याची सवय ही नेहमीच चांगली असते. पण काहींना दोन वेळा ब्रश करणेही जीवावर येते. तुम्ही दिवसभर खाल्लेलं अन्न तुमच्या दातांवर तसेच राहिले की, आपसुकच तुमचे दात पिवळे दिसू लागतात. दातांवर हळद किंवा तुम्ही खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे डाग राहतात. त्यामुळे तुमचे दात न घासणे किंवा चुकीच्या पद्धतीने घासणे तुमच्या दातांचा शुभ्रपणा घालवू शकते.

धूम्रपान:-

धूम्रपान आणि दारु पिण्याची सवयही तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे दारुमध्ये असलेले घटक आणि सिगारेटमध्ये असलेले तंबाखू तुमच्या दातांना पिवळे करु शकते. जर तुम्ही दारु पिणे आणि सिगारेट पिणाऱ्यांचे दात पाहाल तर तुम्हाला त्यांचे दात पिवळे झालेले दिसतील.

घरच्या घरी असा घालवा दातांचा पिवळेपणा:-

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. ते ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची सालं उपयोगी पडते. केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल तुम्ही तुमच्या दातांना घासा.

असे केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. वर म्हटल्याप्रमाणे सालीमध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करते. केळ्यांच्या सालीचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनवेळा केला तरी चालू शकेल. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

लिंबाची फोड आणि खाण्याचा सोडा:-

लिंबू ही ब्लचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे ते तुमच्या त्वचेवर काम करते अगदी त्याच पद्धतीने ते तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यास मदत करु शकते. लिंबामध्ये सायट्रिक असते.

ज्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे एक लिंबाची फोड घेऊन त्यावर खाण्याचा सोडा घाला आणि ही फोड दातावर चोळा आणि अगदी काहीच वेळ ठेवून तुम्ही गुळण्या करा. (लिंबाचा अति वापर तुमच्यासाठी चांगला नाही. लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड तुमच्या दातांसाठी चांगले नाही.

त्याच्या अति वापरामुळे तुमच्या दातांवरील इनॅमल कमी होते आणि त्यामुळे तुमचे दात नाजूक होतात. जे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा वापर अगदी योग्य व्हायला हवा

अपल सायडर व्हिनेगर:-

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर देखील केला जातो. अॅपल सायडर व्हिनेगरमधील असिडीक घटक तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करतात. अॅपल सायडर व्हिनेगर तुमच्या दातांसाठी जितके चांगले आहे तितकेच ते वाईट आहे.

अॅपल सायडर व्हिनेगर तुम्ही थेट तुमच्या दातांना लावू शकत नाही. अगदी किंचिंतसे व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घाला. कापसाचा बोळा किंवा थेट बोटाने तुम्ही तुमच्या दातांवर व्हिनेगर चोळा. एका मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही ते ठेवू नका. नाहीतर दातांवरील आवश्यक इनॅमल निघून जाईल.

बेकिंग सोडा आणि ब्रश:-

आतापर्यंत आपण पाहिलेच आहे की, बेकिंग सोडाचा वापर दातांसाठी केला जातो. तुम्ही थेट बेकिंग सोड्याचा वापर दातांसाठी करु शकता. बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या थेट दातांवर करा. तुमच्या दातांचे डाग निघून  जातील. बेकिंग सोड्याचा वापर करताना थोडे जपून राहा.

कोळसा:-

कोळश्याचा उपयोग दातांची स्वच्छता करण्यासाठी केला जातो हे तुम्ही पाहिले असेलच. कोळसा तुमच्यातील दातांवरील काळेपणा दूर करण्यास मदत करते. कोणतीही इम्प्युरीटी कोळसा काढून टाकण्यास मदत करते. पण हा शास्त्रशुद्ध उपाय नाही. कारण असे अजिबात सिद्ध झालेले नाही. जर तुम्ही कोळशाचा वापर करत असाल तर त्याचे नुकसानही तुम्हाला होणार नाही. त्यामुळे बाजारात मिळणारी अॅक्टिव्ह चारकोल पावडर घेऊन तुम्ही ती तुमच्या दाताला चोळू शकता. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ होतील.


Posted

in

by

Tags: