अश्वगंधाचा चहा पिण्याचे हे आहेत मोठे फायदे….हृदयरोग, मुधमेह असणाऱ्या लोकांसाठी तर वरदान आहे हा चहा…या पद्धतीने करा सेवन

र्मदामध्ये अश्वगंधा या औषधी वनस्पतीला भरपूर महत्त्व आहे. विशेष गुणधर्मांमुळे अश्वगंधाचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर केला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधाचे सेवन केले तर आरोग्याला भरपूर लाभ मिळू शकतात. या औषधी वनस्पतीद्वारे शरीराला पोषण तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल. महिला तसंच पुरुषांनी अश्वगंधाचा चहा का प्यावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती

थंडीमध्ये आरोग्यासाठी लाभदायक:-

अश्वगंधाचे सेवन औषधाच्या स्वरुपात केले जाते. पण थंडीच्या दिवसांत योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास शरीराला अतिरिक्त लाभ मिळू शकतात. अश्वगंधा गरम असते. याच्या सेवनामुळे शरीरात आवश्यक मात्रेत उष्णता निर्माण होते. ज्यामुळे थंडीचा त्रास होत नाही. ज्यांना थंडीच्या दिवसांत अधिक प्रमाणात त्रास होतो, त्यांनी अश्वगंधाचा चहा प्यावा. ​दोन स्वरुपात मिळते अश्वगंधा

बाजारामध्ये अश्वगंधा दोन स्वरुपांत उपलब्ध असते. एक म्हणजे अश्वगंधेची सुकवलेली मुळे आणि दुसरे म्हणजे अश्वगंधाची पावडर. चहा तयार करताना आपण कोणत्या स्वरुपात अश्वगंधेचा उपयोग करणार आहात, यावर अश्वगंधाच्या चहाची रेसिपी आणि सेवनाची पद्धत अवलंबून असते. कारण सुकवलेली अश्वगंधा आणि पावडर या दोघांचाही चहासाठी उपयोग करण्याची पद्धत आणि प्रमाणामध्ये बरंच अंतर आहे.

अश्वगंधा पावडरचा चहा तयार करण्याची पद्धत:-

अश्वगंधा पावडरपासून चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम दीड कप पाणी गॅसवर गरम करत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा अश्वगंधाची पावडर टाका.पाणी उकळू द्यावे. पण यासाठी गॅस मध्यम आचेवरच ठेवावा. १० मिनिटे पाणी उकळू द्यावे. तुमचा अश्वगंधाचा चहा तयार आहे. यामध्ये साखर किंवा गूळ मिक्स करू नका.

मधाचा वापर का करावा?

चहा थंड होऊ द्या आणि त्यात एक चमचा मध मिक्स करा. यानंतर चहाचे सेवन करा. कधीही गरम दूध, चहा किंवा पाण्यामध्ये मध मिक्स करू नये, हे कायम लक्षात ठेवा.अश्वगंधेच्या चहामध्ये साखर किंवा गूळ मिक्स करू नये, कारण मूळतः अश्वगंधा गरम असते. गुळाच्या सेवनामुळेही शरीरात उष्णता निर्माण होते. तर साखर तयार करताना रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जातो. त्यामुळे साखर खाणे टाळावं.

सुकवलेल्या अश्वगंधेपासून चहा तयार करण्याची पद्धत:-

अश्वगंधेच्या मुळाचा एक ते दीड इंच इतका तुकडा घ्यावा. जर मूळ जाड असेल तर केवळ अर्धा इंच इतकंच प्रमाण असावे. एक कप चहासाठी साडेतीन कप पाणी गॅसवर गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये अश्वगंधेचे मूळ टाका. पाणी आटून एक कप होईपर्यंत दोन्ही सामग्री गॅसच्या मध्यम आचेवर उकळू द्यावी. पण हा एक कप चहा दोन माणसांमध्ये वाटून घ्या. म्हणजे अश्वगंधेचा चहा पूर्ण एक कप कधीही पिऊ नये. तसंच दिवसभरात एकदाच हा चहा प्यावा.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा:-

काही जणांना हिवाळ्यामध्ये वारंवार सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्यांचा वारंवार सामना करावा लागतो. अशा लोकांनी तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन घेऊन आहारामध्ये अश्वगंधा चहाचा समावेश करावा. तसंच कोणत्याही गोष्टीचे मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतात. हीच बाब अश्वगंधा चहाच्या बाबतीतही लागू होती. अधिक प्रमाणात हा चहा प्यायल्यास शरीराला जास्त लाभ मिळतील, अशा गैरसमजुतीत राहू नका. उलट यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते.

हे नुकसान टाळण्यासाठी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन अश्वगंधा चहा प्यावा. कारण तुमच्या आरोग्याच्या समस्या समजून घेऊनच तज्ज्ञमंडळी तुम्हाला आहाराचा योग्य सल्ला तसंच प्रमाणाची माहिती देतात.

​डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचाच:-

अश्वगंधाच्या सेवनामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असल्यास हा चहा पिण्यापूर्वी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आरोग्यास नुकसान होऊ नये, यासाठी आहारामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे असते. त्यांच्या सल्ल्यानुसारच डाएटमध्ये योग्य ते बदल करावेत. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे डाएट प्लान फॉलो करू नये.


Posted

in

by

Tags: