नवीन वर्षात,या राशीच्या जातकांना साडेसातीचा त्रास होईल , त्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या

नवीन वर्षात शनिची साडेसाती आणि अडीच वर्षाचा काळ अनेक राशींवर प्रारंभ होणार आहे. ज्यामुळे बर्‍याच लोकांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. पंडितांच्या म्हणण्यानुसार, सन 2021 मध्ये शनिदेव मकर राशीत राहतील आणि 23 मार्च 2021 रोजी तो मकर राशीत वक्री होऊन  11 ऑक्टोबर 2021 रोजी मार्गी लागतील.

या राशीपासून शनिच्या मार्गी होण्यामुळे  धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होतील. मिथुन व तुला राशीवर अडीच वर्ष  प्रारंभ होईल.


जेव्हा जीवनाच्या शनीची साडेसाती आणि अडीच वर्ष प्रारंभ होतो तेव्हा हि चिन्हे दिसू लागतात. या संकेतांचा सहाय्याने तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात शनिची साडेसाती  व अडीच वर्ष ह्यांची सुरवात झाली आहे. पंडितांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांचा जीवनात साडेसाती आणि अडीच वर्ष  सुरू होते,

त्यांना अधिक झोप लागते. कोणत्याही कामात मन नाही लागत . जातकाला  वारंवार लोखंडाने दुखापत होते. एखाद्या गरीब व्यक्तीशी वाद होतो . कोर्ट कचेरी चे चक्र सुरू होते. या व्यतिरिक्त अचानक प्रत्येक कामात पैशाची हानी होते आणि तोटा होतो.

जर या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ लागल्या तर तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात शनिची दशा खराब झाली आहे. शनीची दशा खराब झाल्यास खाली नमूद केलेले उपाय करा. या उपाययोजना केल्यास शनि शांत राहील आणि तुमचे रक्षण करेल .

शनीला शांत करण्यासाठी शनिवारी पीपळाच्या झाडाची पूजा करावी. पूजा करताना या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडावर काळी वस्तू दान करा .

शनि स्त्रोत वाचा.

काळ्या वस्तूचे दान देऊनही शनिदेव शांत होतात. शनिवारी आपण कपडे, डाळी इत्यादी काळ्या गोष्टी दान कराव्यात.

शनिदेवाची उपासना करण्याबरोबर हनुमान चालीसाचे पठण देखील करावे. हनुमान जींना मोहरीचे तेल अर्पण करा.

गरिबांना मदत करा आणि अनैतिक कार्यांपासून दूर रहा. कोणत्याही वादात अडकणे टाळा.

भगवान शिवची उपासना केल्यामुळे तुमचे शनि ग्रहापासून रक्षण होते आणि हा ग्रह तुम्हाला अनुकूल राहतो .

शनिवारी गरीब लोकांना तळलेले खाऊ घाला.

दर शनिवारी खाली दिलेल्या मंत्रांचा जप करावा. शनिदेव चा मंदिरात हे मंत्र वाचा. आधी तुमच्या जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर मंत्रांचे पठण सुरू करा.

ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये।

शनि मंत्र

कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।
सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।

असे काही उपाय जे शनि ग्रहापासून तुमचे रक्षण करतील आणि हा ग्रह तुमच्यासाठी अनुकूल राहील. हे उपाय करून पहा.


Posted

in

by

Tags: