मुलांना शाळेत आणि शिक्षणात गोडी वाटण्यासाठी या शिक्षकांने असे काही पाऊल उचले कि….आता तर शाळेत बसायला सुद्धा जागा नाही

आपल्याला माहित असेल कि कोरोना कालावधीमुळे शाळा बर्‍याच दिवसांपासून बंद आहेत. ज्यामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तथापि, मध्य प्रदेशातील एका शिक्षकाने या काळात चमत्कार केला आहे. एवढ्या वाईट आणि कठीण काळातही या शिक्षकाने मुलांना शिक्षण देण्यात कोणतीही कसर सोडली नाही.  टीकमगड जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे प्रमोद नपीत यांनी मुलांना ऑनलाइन शिक्षणासह त्यांनी त्याच्या शाळेला ट्रेनचे स्वरूप दिले आहे.

मुलांना ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ते वेळ काढून शाळेची सजावट करायचे. प्रमोद नापित यांनी शाळेकडे मुलांचे आकर्षण वाढवण्यासाठी हे सर्व केले आहे. शिक्षक प्रमोद हे त्याच गावचे आहेत, ते लॉकडाऊन पासून शाळा सजवण्याचे काम करीत होते,

आणि आता त्यांनी शाळा पूर्णपणे सजविली आहे. प्रमोद नपीत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपला मोकळा वेळ काढून शाळेला ट्रेनच्या स्वरूपात बदले आहे. जेणेकरून शाळेत आल्यावर मुलांना शिक्षणात रस वाटेल. तसेच प्रमोद नापित म्हणतात की यामुळे मुलांचे शिक्षणाप्रती आकर्षण देखील वाढेल.

प्रमोद नापित यांनी शाळेला जणू खऱ्याखुऱ्या ट्रेनमध्येच बदले आहे. या 80 फूट लांबीच्या प्राथमिक व शासकीय माध्यमिक विद्यालयाला रंगाच्या माध्यमातून अचूक ट्रेनचे स्वरूप देण्यात आले आहे.

प्रमोद नापित म्हणाले की कोविड १९ मुळे मुलांमधील शाळेप्रतीची ओढ कमी झाली आहे. म्हणून त्यांनी मुलांना आकर्षित करण्यासाठी हे सर्व केले आहे. 2 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आम्ही शाळेला ट्रेनचे स्वरूप देऊ शकलो असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे म्हणणे आहे की असे केल्याने मुलांचे शिक्षणाकडे आकर्षण वाढेल आणि ते दररोज शाळेत हजेरी लावतील.

त्यांनी स्वतःच शाळेला ट्रेनचे स्वरूप देण्यासाठी सर्व खर्च केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शाळेला नवीन रूप देण्यासाठी 30 हजार रुपये खर्च केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मोहल्ला शाळा देखील सुरू केली आहे.

यामध्ये गावात मुलांना काळ्या भिंतींवर शिकवले जाते. विशेष म्हणजे कोरोनामुळे शाळा बंद होती. ज्यामुळे मुलांना ऑनलाईन माध्यमातून शिकवले जात होते. तथापि, आता केंद्र सरकारने शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे आणि बर्‍याच राज्यात तर शाळादेखील उघडल्या आहेत. प्रमोद नापित यांनी केलेल्या या युक्तीचा परिणाम खूप सकारात्मक झाला आहे त्यामुळे शाळेत मोठ्या प्रमाणत मुलांची संख्या वाढल आहे.


Posted

in

by

Tags: