जाणून घ्या पिंपळाच्या झाडाचे शास्त्रानुसार असणारे महत्व….का करावी त्याची पूजा…काय होऊ शकतात आपल्याला त्यामुळे फायदे

भारतीय संस्कृतीत वास्तू, वनस्पती आणि वृक्ष यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. वृक्ष, वनस्पती, वेली, निसर्ग सर्वांच्या सान्निध्यात वास्तुतील माणसांचे आरोग्य अतिशय चांगले राहते. शुद्ध हवा, शुद्ध पर्यावरण, पक्षी, फुलपाखरं आदींशी जवळीक साधता येते. प्राणवायू, सुगंध, फुलं-फळं या बरोबर मानवी मन प्रफुल्लित ठेवण्याचं काम ही झाडे सातत्याने करीत असतात.

आपल्या ऋषी-मुनींनी जी काही ग्रंथरचना केली ती निसर्गनियमाला अनुसरूनच केली आहे. वनस्पती व झाडांपासून मिळणारी शुभ ऊर्जा ही पूर्णपणे नैसगिर्क ऊजेर्चा स्त्रोत आहे आणि हा स्त्रोत आपण बंद करायला लागलो आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. असे मानले जाते की, पिंपळाच्या झाडाचे दर्शन-पूजन केल्याने दीर्घायुष आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, शनिवारी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व का आहे

धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनि पिडा दूर होते. आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणांनी भरलेले असल्याचे सांगितले आहे.

शनि अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते. यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करावी.

अध्यात्मिक महत्व- याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही.

अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस?

त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच * ‘शालिग्राम’ म्हणतात.

वैज्ञानीक महत्व- जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन- O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड- CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ – पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन

रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन- O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत  सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते.

आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.

बरेच लोक या प्रकारच्या अंधश्रद्धा ठेवतात की, पिंपळाचे झाड आहे प्रॉपर्टी मध्ये तर खरेदी नाही केली पाहिजे तर, पिंपळाच्या झाडाचा एक इशू आहे की, त्याचे मूळ खूप लांब लांब पर्यंत आतमध्ये पसरलेले असते तर, आधीच्या काळात कच्ची घरे असायची आणि जेव्हा झाड मोठे व्हायायचे आणि त्याची मुळे अधिक पसरली गेली आणि जर वादळ वारे किंवा भूकंप झाला तर घरे पडून जायची कारण ती कच्या मातीची असे परंतु, आपण आताचा जर विचार केला तर आता सिमेंट काँक्रीट ची घरे आहेत.

जर तुम्ही एखादा प्लॉट बघत आहे आणि त्यात पिंपळाचे झाड उगतांना दिसत आहे आणि त्याच्या जवळ खरेदी करण्याचा विचार करत आहे तर, मोठ्या झाडांचे मूळ जितके वाढायचे ते वाढून गेलेले असेल तर तिथे काही अडचण नाही जर तुम्ही घरात राहतात आणि तिथे पिंपळाचे झाड अचानक उगवताना दिसले तरी काही हरकत नाही ते काढून एखाद्या गार्डन मध्ये लावून द्या म्हणजे आपण हिरवळ सगळीकडे करू शकतो.

कल्पवृक्ष जर आपण आपल्या घरात पूर्वीकडे लावले तर आपली विचार करण्याची क्षमता अधिक वाढते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे आणि तिथे आपण आपल्या लहान लहान इच्छा लिहिल्या किंवा तिथे बसून आपण ध्यान केले काही कल्पना केली तर, आपल्याला तिथे लवकरच उत्तर मिळतात.


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *