जर आपले सुद्धा हात-पाय थरथरत असतील किंवा सुन्न पडत असतील…तर त्वरित सावध व्हा अन्यथा अनेक गंभीर परिणामांना तोंड द्याल

हात पाय आणि शरीर थरथरने एक गंभीर समस्या आहे. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अनेकांना वाटते होतं असे त्यात काय? पण हा समज चुकीचा आहे. जर तुमचे हात किंवा पाय परत परत थरथरत असतील तर हे नसांमध्ये काहीतरी समस्या असल्याचे लक्षण असते. जर नेहमी नाही पण कधी कधी तुमच्या शरीराला थरथर किंवा कंप जाणवणं ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही.

कदाचित हे मेंदूच्या काहीतरी आजाराचे लक्षण असू शकतं. अनेकदा लोक याकडे समस्या म्हणून पाहत नाहीत आणि दुखणं वाढतं. दुखणं अति झाल्यास व्यक्ती कोमात जाण्याचासुद्धा धोका असतो, काहीवेळा अपंगत्व येण्याची शक्यता असते. तेव्हा वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणं कधीही चांगलं. पण साधारणत: शरीर थरथरण्यामागे काय कारणं असतात हे आज आपण बघणार आहोत.

थायरॉईड ग्रंथीमध्ये वाढ:-

गळ्याच्या खालच्या भागाच्या मध्यभागी एक लहान ग्रंथी आहे ज्याला थायरॉईड म्हणतात. तथापि, जेव्हा थायरॉईड वाढला जातो तेव्हा हृदयाचे ठोके देखील वाढू लागतात. त्याच वेळी, वजन देखील कमी होऊ लागते आणि हात पाय थरथरतात. अशा परिस्थितीत आपल्याला त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जा आणि एकदा थायरॉईड तपासणी करुन घ्या. असे म्हटले जाते की अनेक औषधे थायरॉईड ग्रंथीची वाढ रोखू शकतात.

ताण हे एक मोठे कारण आहे:-

आजच्या आधुनिक काळात जगात तणाव खूप सामान्य आहे. वास्तविक, जेव्हा कोर्टिसॉल नावाच्या हार्मोनची पातळी शरीरात खराब होऊ लागते, तेव्हा मानसिक तणाव वाढतो. यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह देखील बिघडतो आणि पाय थरथरतात.

जर तुम्हालाही हात-पाय कंपित होण्याची समस्या येत असेल तर दररोज चांगली झोप घ्या आणि व्यायाम करा. यामुळे तणावातून मुक्तता मिळते आणि शरीराचा रक्त प्रवाह संतुलित राहतो.

उच्च कॅफिनचे सेवन;-

हात-पाय कंपित करण्याचे मुख्य कारण म्हणजे कॅफिनचे व्यसन. खरं तर, काही लोक चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यामुळे हात थरथरणे, निद्रानाश, तणाव, वेगवान हृदयाचे ठोके यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, दिवसातून 400 मिलीग्रामपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिण्याचा प्रयत्न करू नका. जर आपल्याला चहा आणि कॉफीचे अधिक व्यसन असेल तर ते नियंत्रित करा.

औषधांचे दुष्परिणाम:-

हात-पाय कंपित होण्याचे प्रमुख कारण औषधे देखील असू शकतात. यात ब्लड प्रेशर, एंटीडिप्रेसस, दम्याच्या औषधांचा समावेश आहे. या औषधांचे दुष्परिणाम बरेच जास्त आहेत. अशा परिस्थितीत हे हात-पाय थरथरण्याचे एक मोठे कारण बनू शकतात.

जर आपल्याला असेही वाटत असेल की एखाद्या औषधामुळे आपले हात आणि पाय थरथरत आहेत तर मग त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण नंतर ते मोठ्या समस्येचे कारण बनू शकतात.

दारूचे व्यसन:-

अनेकदा दारू सुटता सुटत नाही.  मग लोक दारू सोडण्याचा संकल्प लांबणीवर टाकतात.  याने होतं असं की शरीराला दारुची सवय होते आणि काही काळ दारूपासून दूर राहिल्यावर हातपाय थरथरतात. याला withdrawl symptoms म्हणतात. ते टाळण्यासाठी लोक परत दारू प्यायला लागतात. तर हे चुकीचे आहे राव!! अशावेळी डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य असते.

साधारणपणे उतार वयात हात थरथरू लागतात. मात्र तरुण वयात ही समस्या निर्माण होत असेल तर चिंतेचं बाब आहे. कदाचित हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. त्यामुळे हात नेहमीच थरथरत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या हात थरथरणे कोणत्या आजाराचे संकेत असू शकतात.

अ‍ॅनिमिया – शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या होते.अ‍ॅनिमियाच्या रुग्णांमध्ये कमजोरी येते, ज्या कारणाने त्यांचे हात थरथरतात.

ब्लड प्रेशर – ब्लड प्रेशर कमी झाल्याने शरीरात ब्लड शुगर कमी होत असल्याने स्ट्रेस वाढू लागतो, त्यामुळे हात थरथरू लागतात.

शुगर – जर हात नेहमीच थरथरत असतील तर शुगर लेवल अवश्य चेक करून घ्या.

बी १२ ची कमी – जीवनसत्व बी१२ ला सामान्यपणे ‘ऊर्जा जीवनसत्त्व’ म्हणतात. कधी कधी हात थरथरणे बी १२ जीवनसत्व कमी असल्याचे संकेत देते.

हार्मोन्समध्ये बिघाड – शरीरात काही हार्मोन्स वाढल्या कारणानेही स्ट्रेसचा स्तर वाढतो तसेच ब्लड सर्कुलेशन बिघडतं. त्यासोबतच व्यक्तीमध्ये चिडचिडपणा वाढतो, गोष्टी विसरु लागतो आणि हात थरथरु लागतात.

मात्र कायम हात थरथरणे हे याचा अर्थ कोणता तरी आजार असणे असाही नाही, काही लोकांचे हात आनुवंशिकतेमुळेही थरथरू शकतात.

शरीर थरथरण्याला फक्त हेच आजार कारणीभूत असतात असं नाही, तसेच कित्येकदा वेगवेगळ्या रोगांची लक्षणं एकत्रित दिसू शकतात, पण कधीकधी तितका गंभीर आजार झालेला नसूही शकतो. पण वेळीच खबरदारी घेणं हे पुढे जाऊन निस्तरण्यापेक्षा कधीही चांगलं. गरज पडल्यास दुसऱ्या डॉक्टरला दाखवून दोन डॉक्टरांचे  तुमच्या आजाराबद्दल एकच मत आहे का हे ही पाहता येईल.


Posted

in

by

Tags: