दातदुखी, कावीळ, क्षयरोग, हृदयरोग, टायफॉईड, जुलाब असा कोणताही आजार असो फक्त करा पिंपळाच्या पानांपासून हे उपाय आपले अनेक रोग नाहीसे झालेच समजा

पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहीत असतं. पण त्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजलं गेलं आहे पण त्याचा खरा फायदा होतो तो आरोग्यासाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळाचं झाड हे असं झाड आहे जे दिवसातील 24 तास तुम्हाला ऑक्सिजन मिळवून देतं. याच्या पानांचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो,

नक्की काय फायदा होतो हेच आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. केवळ आपल्यासाठी लहानपणीपासून मोठं झाड असतं इतपत माहिती पिंपळाबद्दल आपल्या सर्वांनाच असते.  पण तुम्हाला तुमच्या आरोग्याासाठी त्याच्या पानांचा उपयोग करून घेता येतो. खरं तर अनेक रोगांवर याची पानं गुणकारी आहेत. जाणून घेऊया नक्की काय आहेत याचे फायदे.

पिंपळाच्या पानांचे फायदे:-

पिंपळ नक्की काय आहे:-

पिंपळाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाचं मूळ हे खूप दूरवर पसरतं. अनेक जुन्या पुराण्या आयुर्वेदीक ग्रंथामध्ये पिंपळाचं झाड आणि त्याच्या पानाबद्दल अनेक गुण सांगण्यात आले आहेत. पिंपळाच्या पानाच्या प्रयोगामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा अधिक प्रमाणात मिळतो.

तसंत तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असेल, सूज आली असेल अथवा त्रास होत असेल तर तुम्हाला पिंपळाच्या पानाचा उपयोग करून घेता येतो. तसंच सेक्शुअर स्टॅमिना वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि गर्भधारणेसाठीदेखील याची मदत होते. पिंपळाच्या पानामुळे रक्त चांगले होते आणि त्याच्या सालीमुळे तुमचं पोटदेखील साफ राहातं.

डोळ्यांच्या अनेक आजारांवर पिंपळ फायदेशीर ठरतो. पिंपळाची पानं डोळ्यांचे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पिंपळ्याच्या पानातून निघणारा चीक हा डोळ्यांना लावल्यास, डोळ्यांमध्ये काही खुपत असल्यास, ते लवकर बरे होते. पिंपळाचं पानं हे डोळ्यांना थंडावा देतं.

दम्याच्या समस्येपासून मुक्तता:-

बऱ्याच जणांना श्वासाचा अथवा दम्याचा त्रास असतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सुक्या फळांचा उपयोग करून घेऊ शकता. पिंपळाची सुकी फळं तुम्ही वाटून घ्या आणि साधारण 2-3 ग्रॅम या प्रमाणात 14 दिवस पाण्यातून सकाळ – संध्याकाळ तुम्ही घ्या. यामुळे श्वासाचा आजार आणि खोकलादेखील निघून जातो.

पोटदुखीपासून मुक्तता :-

पोटदुखी ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी होतच असते. त्यासाठी तुमच्याकडे पिंपळ हा सोपा उपाय आहे. पिंपळाची पानं घेऊन तुम्ही त्याचा काढा तयार करा. हा काढा पिऊन तुमचं पोट साफ होतं आणि तुमची बद्धकोष्ठतेची समस्यादेखील दूर होते.

तसंच नुसती पिंपळाची पानं खाल्ली तरीही तुमची पोट दुखी बंद होते. पिंपळाची काही पानं वाटून तुम्ही त्यामध्ये गूळ मिक्स करा आणि याच्या गोळ्या करा. हे दिवसातून तुम्ही 3-4 वेळा खाल्लं तर बद्धकोष्ठासारखा आजार पळून जातो. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला जर खूप आधीपासून असेल तर तुम्ही नियमित पिंपळाची 5-10 फळं खायला हवीत.

दातदुखी:-

पिंपळाची साल पाण्यात उकळून घेऊन त्याची चूळ भरल्यास,  दातांचे आजार बरे होतात. तसंच पिंपळाची ताजी वेल घेऊन रोज तुम्ही त्याने दात घासले तर दात मजबूत होतात. तसंच दातदुखी बंद होते. तसंच हिरड्यांची सूज आणि तोंडातून येणारी दुर्गंधी सुद्धा निघून जाते.

याशिवाय तुम्ही पिंपळाची साल, कत्था आणि 2 ग्रॅम काळी मिरी एकत्र करून वाटून घ्या आणि याची पावडर तुम्ही रोज दाताला लावलीत तर तुम्हाला  दातांच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.

फाटलेल्या टाच:-

घरात काम करणाऱ्या महिलांना नेहमीच पायाला भेगा पडण्याची समस्या उद्भवते. तुम्हाला तुमचे पाय अधिक कोमल आणि मऊ मुलायम हवे असतील तर तुम्ही पिंपळाच्या पानांचा चीक अथवा रस पायांना लावा. यामुळे तुम्हाला पायांवरील भेगांपासून सुटका मिळेल.

सुरकुत्यांवर रामबाण इलाज:-

पिंपळाची पानं त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतात. तुमच्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्हाला याचा वापर करता येऊ शकतो. पिंपळाची ताजी पानं भिजवून तुम्ही त्वचेवर याचा लेप द्या. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

क्षयरोग:-

क्षयरोग हादेखील एक गंभीर आजार आहे. वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. मुळात हा आजार झाल्यानंतर तुम्ही घाबरून जायची अजिबात गरज नाही. यावर अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे पिंपळाचं मूळ. याचं रोज सेवन केल्यास, क्षयरोगाच्या रूग्णांना त्याचा फायदा होतो. क्षयरोग बरा होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

टायफॉईड:-

टायफॉईड हा नक्कीच गंभीर ताप आहे. यावरील उपाय म्हणून तुम्ही पिंपळाच्या सालीचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सालीचं चूर्ण करून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी तुम्ही मधासह हे चाटण खा. यामुळे तुमचा टायफॉईड निघून जायला मदत होते.

कावीळ:-

कावीळ हा असा आजार आहे ज्यावर आयुर्वेदीक औषधांचा परिणाम जास्त लवकर होतो. पिंपळाची पानं हा यावरील एक रामबाण उपचार आहे. तुम्ही पिंपळाची 3-4 नवी पानं खडीसाखरेसह साधारण 250 मिली. पाण्यात बारीक करून वाटा. हे सरबत तुम्ही दिवसातून 2 वेळा प्या. साधारण 3 ते 5 दिवस तुम्ही याचा प्रयोग करून पाहा. तुम्हाला कावीळीपासून नक्की सुटका मिळेल.


Posted

in

by

Tags: