निता अंबानी पितात 3 लाखाचा चह… जाणून घ्या त्यांचे हे 8 महागडे शौक…ज्यासाठी त्या दिवसाकाठी कित्येक कोटी रुपयांचा खर्च करतात…

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी  आणि त्यांची पत्नी नीता अंबानी कोणत्या-न्-कोणत्या तरी कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अंबानी कुटुंब फॅशन स्टाइलमुळे  देखील चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक महिलेचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.

सूटपासून ते साडी, कॅज्युअल कुर्त्यापासून ते लेहंग्यापर्यंत अंबानी कुटुंबातील महिलांचा स्टायलिश अवतार आपण आतापर्यंत बऱ्याचदा पाहिला असेल. पण आता नीता अंबानीं एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आल्या आहेत. निता अंबानी या जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत.

निता या नेहमीच हेडलाईनमध्ये असतात. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्या तरी आता त्या एका श्रीमंत कुटुंबाच्या सून आहेत. त्यांच्या आवडीही यूनिक आहेत. इंटरनेटवरील रिपोर्टनुसार निता अंबानींचे 8 छंद खूप महागडे असून सर्वसामान्य लोक त्याची कल्पनाही करु शकत नाही. आपणास सांगू इच्छितो कि त्या तब्ब्ल तीन लाखांचा चहा पितात.

तीन लाख रुपयांचा चहा:-

निता अंबानी यांनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या जपानच्या सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड असलेल्या नोरिटेकमध्ये चहा पितात आणि या एका कपाची किंमत 3 लाख रुपये आहे. आणि आज आपण असेच त्याचे महागडे शौक जाणून घेणार आहोत.

डायमंड लावलेले बॅग:-

निता आपल्या स्टाईलनुसार वेगवेगळ्या बॅग वापरतात. या बॅगेवर डायमंड लावलेले असतात. निता यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ब्रँडचे बॅग आहेत. या बॅगांवर लावण्यात आलेल्या डायमंडची किंमत 4 लाखांच्या पुढे असते.

एकदा वापरलेले शूज पुन्हा वापरत नाही:-

निता अंबानी यांना महागड्या शूज आणि सँडलची खूप आवड आहे. त्यांच्याकडे पेट्रो, गार्सिया, जिमी चू, पेल्मोरा, मर्लिन यासारख्या ब्रँडचे शूज आहेत. यांची किंमत 1 लाखांपासून सुरु होते. असं म्हटलं जातं की निता एकदा वापरलेले शूज पुन्हा वापरत नाहीत.

घड्याळ्यांचे कलेक्शन:-

निता यांना घड्याळ्यांचीही आवड आहे. त्यांच्याकडे बुलगरी, कार्टियर, रॅडो, गुच्ची, केल्विन केलिन आणि फोसिल सारख्या ब्रँडची घड्याळे आहेत. या घड्याळ्यांची किंमत 1 ते 2 लाखांपासून सुरु होते.

निता अंबानी अनेक कार्यक्रमांमध्ये दागिने घातल्याचं पाहिलं असेल. निता अंबानी यांच्या दागिन्यांची किंमत एक कोटीपासून सुरु होते.

साडी:-

निता अंबानी यांच्या साडीवर डायमंड आणि सोन्याचे काम केलेले असते. रिपोर्टनुसार, निता यांनी त्यांच्या मुलाच्या इंगेजमेंट दिवशी 40 लाखांची साडी घातली होती. निता अंबानींचे लिपिस्टिक अत्यंत महागडे असतात. त्यांच्या कलेक्शनमध्ये 40 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे लिपिस्टिक ब्रँड आहेत. मुकेश अंबानी यांनी 2007 मध्ये आपल्या पत्नीला 100 करोड रुपयांचे जेट भेट दिले होते. यामध्ये फाईव्ह स्टार सारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.


Posted

in

by

Tags: