जर आपल्याला पण थकवा अशक्तपणा वाटत असेल आणि जर आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल…तर आजच करा हे उपाय

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे.

बदलते हवामान आणि प्रदूषित हवेमुळे अनेक प्रकारचे हानिकारक विषाणू आणि जिवाणू श्‍वसनासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात. आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर झाल्यावर यांच्यामुळे सर्दी, खोकला आणि अॅलर्जी सारख्या समस्या उद्भवतात. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता होय.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्‍यक आहे. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आपण आजारांना बळी पडतो.

प्रतीकात्मक तस्वीर

औषधी काढा किंवा चहा 
तुळस, आले, दालचिनी किंवा मिरे आणि हळद यांपासून बनविलेला काढ्यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात. आले आणि गवती चहापासून बनविलेला चहा आरोग्यदायी असतो. सर्दी, खोकला आणि अन्य आजारांवर एक घरगुती आणि गुणकारी उपाय म्हणून काढा आणि चहाचा वापर होतो. तुळस आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टरीयल आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. तसेच घशातील खवखवीवर उपयुक्त.

प्रतीकात्मक तस्वीर

ग्रीन टी आणि ब्लॅक टीन दोन्हींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास फार मदत होते. पण म्हणून याचं फार जास्त सेवन करावं असं नाही. दिवसातून केवळ दोन कप सेवन करावं. जास्त प्रमाणात यांचं सेवन कराल नुकसानच होऊ शकतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काळ्या मिरीचा वापर होतो. तसेच फुफ्फुसांच्या मजबुतीसाठीही काळीमिरी उपयोग असते. मात्र, अॅसिडीटी, उष्णेतेचे विकार, जळजळ, गॅस यासारखे त्रास होत असल्यास काळ्या मिरीचा वापर टाळावा. काळ्या मिरीने उष्णतेचे विकार वाढत असल्याने त्याचा वापर जपून करावा.

दिवसातून चार ग्रॅम म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त मिरी घेऊ नये. लसूणाचा आहारात समावेश असतो. त्यामुळे पचनाला मदत होते. मात्र, तोंडाला दुर्गंधी येत असल्यास आणि अशक्तपणा वाटत असल्यास लसूण टाळावे. दिवसभरात सात ग्रॅमपेक्षा जास्त म्हणजे एक चमच्यापेक्षा जास्त लसून पेस्ट वापरू नये. याची पावडर वापरत असल्यास चिमूटभर वापरावी.

प्रतीकात्मक तस्वीर

संत्री आणि मोसंबी:-

संत्री आणि मोसंबी ही अत्यंत गुणकारी फळे आहेत. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असल्याने शरिरातील अशक्तपणा दूर होतो.

शारीरिक काम करणाऱ्यासाठी मोसंबीच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरते. या फळांना अँटिऑक्सिडंट्स चा एक उत्तम स्रोत मानले जाते. याच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित ठेवली जाते.

प्रतीकात्मक तस्वीर

नियमित दह्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सोबतच याने पचनक्रियाची सुरळीत राहण्यात मदत होते. म्हणजे दही खाल्ल्याने तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. तसेच ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. सोबतच यात अॅटी-मायक्राबिअल गुणही असतात. त्यामुळे रोज ओट्स खाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे.


Posted

in

by

Tags: