च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे…सलग एक महिना च्यवनप्राश सेवन केल्यास आपल्या शरीरात होतील हे आश्यर्यकारक बदल…डॉक्टरांची गरज सुद्धा…

च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा  व इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.

च्यवनप्राश हे लहान  मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करावा.

च्यवनप्राशचा मुख्य घटक हा आवळा आहे. आवळा हे एक उत्तम प्रकारचे व सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक हे  औषध आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य मानले जाते. त्यामुळे वाढत्या वयामुळे शरीराची होणारी झीज कमी प्रमाणात व्हावी व तारुण्य टिकवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊया च्यवनप्राशचे खाण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत व त्याचे सेवन कसे करावे:

च्यवनप्राश सेवन करण्याचे काही नियम:-

बरेच वेळी लोकांचा गैरसमज असतो कि च्यवनप्राश केवळ हिवाळ्यामध्ये सेवन करावे. परंतु, आयुर्वेदामध्ये याला संपूर्ण वर्षभर सेवन करण्याच्या सल्ला दिला गेला आहे. 5 वर्षाखालील मुलांना पाव चमचा, 10 वर्षाखालील मुलांना अर्धा चमचा व त्यानंतर 1 चमचा याप्रमाणे च्यवनप्राश दररोज सेवन करावे.

वयाच्या पस्तिशीनंतर त्यात चांदी, सुवर्ण अशी द्रव्ये मिसळून तयार केलेले च्यवनप्राश सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील याचे सेवन करावे. त्यामुळे मुलांना आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळण्यास मदत होते. परंतु च्यवनप्राश तुपासोबत घेऊ नये. कारण तूप हा च्यवनप्राश चा एक घटक आहे. त्यामुळे तुपासोबत घेतल्याने वजनवाढीची समस्या उद्भवू शकते.

च्यवनप्राश कोणत्या वेळी सेवन करावे:-

आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश व कोणतेही आयुर्वेदिक औषध सकाळी घेणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर च्यवनप्राश सकाळी रिकामे पोटी खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्यापूर्वी एक चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेतल्याने याचा चांगला फायदा होतो. तसेच झोपण्यापूर्वीदेखील आपण १ चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेऊ शकतो.

च्यवनप्राश खाण्याचे फायदे:-

च्यवनप्राश हा मुलांसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा चांगला पदार्थ आहे. यामुळे मुले विषाणू आणि फंगल संक्रमणापासून बचावतात. च्यवनप्राशच्या सेवनाने पचन सुद्धा उत्तम राहते. बाळाला अपचन झाल्यास कोमट पाण्यासह एक चमचा च्यवनप्राश त्याला खाऊ घालावे. याशिवाय च्यवनप्राश मध्ये असणारे पदार्थ त्याची बुद्धीमत्ता वाढवण्यासाठीही मदत करतात. च्यवनप्राशचे नियमित सेवन केल्याने मेंदूची क्षमता वाढते. च्यवनप्राशमुळे मुलांना एनर्जी सुद्धा मिळते आणि मुल दिवसभर अगदी तंदुरुस्त राहते.

घरगुती च्यवनप्राश चांगले की बाजारातील:-

मार्केट मधील च्यवनप्राश देखील उत्तम असते. त्यातही हेच पदार्थ असतात जे आपण घरगुती च्यवनप्राश बनवण्यासाठी वापरतो. पण सध्याच्या करोनाच्या काळात बाहेरून कोणतीही वस्तू आणणे हे धोकादायक आहेच.

त्यामुळे शक्य असल्यास वरील कृतीप्रमाणे च्यवनप्राश घरीच बनवावे. तुम्ही ते स्वत:हून बनवत असल्याने सुरक्षेशी तडजोड केलेली नसते आणि हे पूर्णत: घरगुती असल्याने कोणत्याही रसायनांचा यात वापर नसतो. ही माहिती आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांनाही या घरगुती च्यवनप्राश बद्दल सांगा


Posted

in

by

Tags: