जाणून घ्या बटाटे उकडण्याची योग्य पद्धत कोणती…जर आपण पण या पद्धतीने बटाटे उकडत असाल…तर आपल्याला त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही

बटाट्याची भाजी सगळ्यांकडे आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवली जाते. कधी बटाट्याची सुकी भाजी, कधी रस्सा तर कधी पराठे बटाट्याची गरज आपल्याला भासतेच. बरेचदा बटाटे हे उकडून घ्यावे लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का, बटाटे उकडण्याची योग्य पद्धत काय आहे. ज्यामुळे बटाटे योग्य प्रमाणात उकडले जातील आणि त्यातील पोषक तत्त्वही कायम राहतील.
कसे उकडावेत बटाटे:-साधारणतः काहीजणी बटाटे व्यवस्थित उकडले जावेत म्हणून ते कापून मग उकडायला ठेवतात. पण असं करू नये, कारण यामुळे यातील पौष्टिक सत्त्व नष्ट होतात. कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी साधारणतः 11 मिनिटं लागतात. एक मिनिटं तयारीसाठी आणि बाकीची 10 मिनिटं उकडण्यासाठी लागतात.
बटाटे उकडण्याची ही आहे योग्य पद्धत:-प्रेशर कुकरमध्ये बटाटे उकडायचे असल्यास मोठ्या कुकरमध्ये एक किलो बटाटे एक लिटर पाणी आणि 1/4 चमचा मीठ घालावं. नेहमी लक्षात ठेवा की, कुकरमध्ये पाणी नेहमी 75% टक्के असावं.
कुकरचं झाकण बंद केल्यावर गॅसची फ्लेम वाढवावी. गॅसची फ्लेम वाढवल्यावर 10 मिनिटांपर्यंत किंवा 4 शिट्ट्या कराव्या. साधारणतः बटाट्यांच्या आकारानुसार त्यांना शिजण्यास कमी-जास्त वेळ लागतो. त्यानंतर गॅस बंद करा आणि कुकरची वाफ जाईपर्यंत थांबा.
बटाटे व्यवस्थित उकडले आहेत की नाही हे पाहण्यासाठी सुरीचं टोक बटाट्यात खूपसून पाहा. जर बटाटे नीट शिजले नसतील तर पुन्हा एखादी शिट्टी करा. बटाटे उकडताना त्यात थोडंसं मीठ घालायला विसरू नका. यामुळे बटाटे एकदम मऊ किंवा फुटणार नाहीत आणि सालंही पटकन निघतात.
बटाटे विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी:-हिरवा रंगाचे बटाटे असतील तर ते कधीच घेऊ नका. हे बटाटे खराब झालेले असतात. यामध्ये सोलनिनचं प्रमाण जास्त असतं. शक्यतो असे बटाटे चुकून तुम्ही घेतलेल्या बटाट्यांमध्ये आल्यास त्याचा वापर शक्यतो हिरवा भाग काढून करा.
कधी आपण एकाच वेळी जास्त प्रमाणात बटाटे विकत घेतो आणि त्याचा बरेच दिवस वापर केला जातो. पण काही काळाने असे बटाटे सुरकुतात, असे बटाटे आरोग्यासाठी अपायकारक असतात. त्यामुळे असे बटाटे खाणं टाळा.
उकडलेल्या बटाट्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. बटाट्यामध्ये कॅरोटीनॉयड्स, फ्लेवनॉयजड्स आणि फिनोलिक अॅसिड यासारखे अँटी-ऑक्सिडेंट्स आहेत. बटाट्यातील घटक त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते. बटाट्यामुळे हाडे मजबूत होतात. कारण यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते.
मोड आलेल्या बटाट्यांचं सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. भरपूर दिवस बटाटे ठेवल्यामुळे त्यांना मोड आले असल्यास त्या बटाट्यांचं सेवन करू नये. कारण असे बटाटे तुमच्या नर्व्हस सिस्टमसाठी हानीकारक असतात. त्यामुळे पुढच्या वेळी बटाटे विकत घेताना आणि उकडताना वरील काळजी नक्की घ्या.