काय आपल्याला सुद्धा अकारण घाम येतो आहे…तर आपले आयुष्य धोक्यात आहे समजा…त्यामुळे त्वरित या गोष्टीवर लक्ष द्या… अन्यथा

घाम येणे ही शरीरातील उत्सर्जनाची क्रिया असून नैसर्गिक परिणामाव्यतिरिक्‍त अन्य वेळी घाम येणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असते. शरीराचे तापमान नियंत्रित होण्याचे कार्य घाम येण्याच्या यंत्रणेमार्फत होत असते.

वातावरणा उष्ण नसताना किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक कारणाशिवाय येणारा घाम अस्वास्थ्याचे लक्षण मानले जाते. क्षय रोगाची सुरुवात, एच.आय.व्ही.ची बाधा, रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी होणे, हृदय रोग, थायरॉईड यांसारख्या आजारात देखील घाम सुटण्याची लक्षणे दिसतात. त्यामुळे कारण नसताना येणाऱ्या घामाकडे काळजीपूर्वक बघणे गरजेचे असते.

शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी घाम येण्याची यंत्रणा कार्यरत असते. शरीराचे तापमान प्रमाणे बाहेर वाढल्यास त्रास होतो. हे तापमान वाढू नये यासाठी शरीरात एक यंत्रणा सतत कार्य करत असते.

त्या यंत्रणेचा एक भाग म्हणजे घाम सुटल्यावर नियंत्रण ठेवणे होय. घाम आल्यानंतर त्वचा ओली राहते. ओल्या त्वचेवरील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यास त्वचा गार होते. हवेत उष्मा वाढला किंवा आपण चांगला व्यायाम केला म्हणजे शरीर तापते. अशा वेळी घाम येणे हे स्वाभाविक असते. मात्र हवेत उष्मा नसताना किंवा दुसरे कोणतेही श्रम न करता खूप घाम सुटणे हे आरोग्याच्या अस्वस्थ्याचे लक्षण मानले जाते. असा घाम संपूर्ण शरीरावर किंवा काही विशिष्ट भागांवरच सुटू शकतो.

सर्व अंगावर घाम येतो तेव्हा घाम सुटल्यावर ताबा असणाऱ्या मेंदूच्या भागावर तशा आज्ञा आलेल्या असतात. मेंदूच्या हायपोथॅलॅमस नावाच्या भागाकडे शरीराचे तापमान सांभाळण्याचे काम असते.

या ठिकाणाहून सिम्पॅथॅटिक या मज्जा संस्थेच्या एका भागामार्फत सर्व शरीरावरील त्वचेत असणाऱ्या घामाच्या ग्रंथींना उद्यापित केले जाते आणि घाम सुटतो. कोणत्याही कारणाने ताप आला तरी शरीर थंड करण्यासाठी या कामाचा फायदा शरीराद्वारे घेतला जातो. काही वेळा ताप अगदी कमी असतो. तो रुग्णाला जाणवतही नाही. मात्र ताप उतरण्याच्या क्रियेमुळे सुटलेला घाम मात्र संबंधित व्यक्‍तीला जाणवतो.

क्षयरोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीला सुरुवातीला मध्यरात्री असे घडते. एचआयव्हीबाधीत व्यक्‍तीला किंवा लिम्फोमा आजारातदेखील हा प्रकार आढळतो. तसेच इतर जीवाणू किंवा विषाणू यांनी शरीरात प्रवेश केल्यावर ताप येतो. ताप येताना थंडी वाजते,

ताप उतरताना घाम येतो. घाम येण्यासाठी सिंपॅथॅटिक मज्जासंस्था कार्यान्वित व्हावी लागते. हे कार्य अॅड्रेनॅलीन आणि अॅसीटाईल कोलीन या नावाच्या संप्रेरकांमार्फत हे कार्य केले जाते. अॅड्रेनॅलीन हे आपल्या शरीरात सुप्रारिनल ग्रंथी तयार करतात. स्वतःला वाचविण्यासाठी त्याचा प्रतिसाद मेंदूत तयार होतो. याचा एक भाग म्हणून अॅड्रिनॅलीनची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. त्यामुळे त्वचेवर घाम सुटू लागतो.

रोगांचा घामाचा संबंध

अलीकडच्या धावपळीच्या काळात माणसाच्या चिंता वेगवेगळ्या कारणांमुळे अधिक प्रमाणात वाढलेल्या दिसतात. अतिशय चिंतातूर अवस्थेतदेखील सर्वांगावर घाम सुटू शकतो. रक्‍तातील सारखेचे प्रमाण जास्त प्रमाणत घटले तर धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

चांगले आरोग्य असणाऱ्या माणसाच्या रक्‍तातून साखरेचे प्रमाण कमी होऊ लागले म्हणजे अड्रिनॅलीनचे स्त्रवणे वाढते आणि घाम सुटू लागतो. तसेच साखर कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, आतड्यातून साखर शोषली जाण्यापूर्वी अर्धवट पचलेले अन्न वेगाने पुढे जाते.

जठर आणि लहान आतड्यावरील विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे किंवा मद्य घेणाऱ्या व्यक्‍तीच्या यकृताच्या पेशी अकार्यक्षम बनल्यामुळे अशी स्थिती ओढावते. यकृतामध्ये ग्लुकोजेन नावाची शर्करा असते.

रक्‍तातील ग्लुकोज शर्करा वापरली गेली म्हणजे ग्लायकोजनचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि रक्‍तशर्करेची पातळी 70च्या वर ठेवली जाते. मद्यामुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो. खाण्यापिण्याची शुद्ध न राहिल्यामुळे दीर्घकाळ उपाशी असल्याच्या स्थितीत मद्यपी राहतो. परिणामी साखरेचे रक्‍तातील प्रमाण बरेच कमी होते. कधीकधी 40 किंवा त्यापेक्षाही कमी होते. अशा स्थितीत व्यक्‍ती बेशुद्ध पडते. तिला फिट्स येतात आणि मृत्यूचा धोका वाढतो.

रक्‍तशर्करा कमी होऊ लागल्यास अॅड्रेनॅलीनचा स्त्राव अधिक वाढतो आणि व्यक्‍तीला घाम सुटू लागतो. मद्यपान नियमितपणे करणाऱ्या व्यक्‍तीला अचानक मद्य सोडावे लागते. कुठल्याही कारणाने रक्‍तदाब अचानक कमी झाला तर मेंदूला रक्‍तपुरवठा कमी होतो. हा धोक्‍याचा संदेश समजून प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मेंदूद्वारे प्रतिसाद दिला जातो आणि घाम सुटतो.

शरीरात कोठेही तीव्र वेदना जाणवली म्हणजे असेच होते. हृदय विकाराचा झटका येतो तेंव्हा छातीत वेदना होतात आणि रक्‍तदाबही उतरतो. साहजिकच हृदय विकाराचा झटका येतो तेंव्हा दरदरून घाम सुटतो हे महत्त्वाचे लक्षण दिसून येते. काही व्यक्‍तींना या वेळी छातीत वेदना जाणवत नाहीत मात्र दरदरून घाम सुटू लागतो. त्यामुळे अशा वेळेस रक्‍तातील साखर कमी होते आणि घाम येतो. म्हणून असे लक्षण दिसल्यास हृदय विकाराच्या झटक्‍याचा विचार करणे आवश्‍यक असते.

अंतस्त्रावी ग्रंथींच्या आजारातही असा घाम येतो. मानेत असणाऱ्या थायरॉईड ग्रंथींचे कार्य प्रमाणाबाहेर होऊ लागले की, असा प्रकार दिसून येतो. या वेळी तळहात गरम व ओलसर असतात. पिट्युटरी ग्रंथींचे कार्य वाढले तरी हाच प्रकार आढळून येतो. तर स्त्रियांच्या बाबतीत रजोनिवृत्तीच्या काळात अचानक शरीर गरम होते, नंतर घाम सुटणे अशी स्थिती निर्माण होते.

काही औषधांचा परिणाम म्हणूनही घाम येण्याची प्रक्रिया घडते. काही औषधांचा वापर रक्‍तवाहिन्या रुंदावण्यासाठी करतात. त्वचेच्या रक्‍तवाहिन्या रुंदावल्या म्हणजे शरीर गरम होण्याची भावना येते. या अवस्थेतून बरे होण्यासाठी शरीर घाम सोडून प्रतिसाद देते. ज्या व्यक्‍तींना हृदयविकार आहे त्यांना नायट्रेट्स् जातीची औषधे दिली जातात. तसेच मेंदूला रक्‍तपुरवठा वाढवण्यासाठी निकोटीनीक

अॅसिड पासून बनविलेले रेणू वापरले जातात. काही औषधात मद्यार्क असतो. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे घाम येणे अपेक्षित असते. लहान मुलांना ड जीवनसत्वाच्या अभावाने होणाऱ्या मुडदूस आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार घाम येण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. थोडक्‍यात अकारण घाम येण्यामागे काही तरी कारण असते हे जाणून घ्याणे महत्त्वाचे ठरते.


Posted

in

by

Tags: