कापराचे असे फायदे जाणून आपण सुद्धा आश्चर्यचकित व्हाल…एका कापरामुळे आपल्या अनेक समस्या होऊ शकतात नाहीशा.

कापराचे असे फायदे जाणून आपण सुद्धा आश्चर्यचकित व्हाल…एका कापरामुळे आपल्या अनेक समस्या होऊ शकतात नाहीशा.

कापूर बद्दल आपल्याला किती माहिती आहे? आपल्याला त्याचे औषधी गुणधर्म माहिती आहेत काय? आपण कापूर बहुतेकदा पूजा हवन-आरती अशासाठी प्रत्येक घरात वापरला जातो, परंतु याशिवाय कापूरचे अनेक फायदे आपल्याला आहेत. दैनंदिन जीवनात होणाऱ्या बर्‍याच समस्यांसाठी कापूर हा एक रामबाण उपाय आहे.

कापूरमध्ये प्रतिजैविक आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. या कारणास्तव हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त आहे. आपल्यासाठी कापूर आणि कापूर तेल दोन्ही सुद्धा खूप उपयुक्त आहेत. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊयाः

कापूर

त्वचेवर कापूर तेल लावल्याने मुरुम आणि आपले पिंपल्स बरे होतात. एवढेच नाही तर ते आपल्या चेहर्‍यावरील किंवा शरीराच्या इतर भागावरील जुने डाग मुळातून काढून टाकते.

कापूर हा आपला तणाव कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कपाळावर कपूर तेल लावल्यास किंवा केसांना कापूरचे तेल लावल्यास आपला तणाव कमी होतो.

तसेच आपल्यला कोठे भाजले असेल किंवा कापलं असेल तर खोबरेल तेलात कापूर टाकून लावल्यास आराम मिळतो. याने भाजल्यावर होणारी जळजळ सुद्धा कमी होते.

तसेच कापूराचा उपयोग सर्दी, खोकला, कमी करण्यासाठीही केला जाऊ शकतो.

केस गळणे

आपल्याला टक्कल पडले असेल किंवा आपले केस गळत असतील तर या समस्येमध्ये, कापूर तेल आपल्या केसांना खूप मदत करते. केस गळणे आणि डोक्यातील कोंड्याच्या समस्येमध्ये कापूर तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते.

केसांमध्ये कापूर तेल लावल्याने आपले केस वाढू लागतात आणि मजबूत देखील बनतात. यासाठी कापूर तेल दहीमध्ये मिसळा आणि केसांच्या मुळांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर आपले केस धुवा.

कापूर तेल

एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात कापूर तेल घाला आणि त्यामध्ये आपले पाय बुडवा असे केल्याने आपल्या पायांना पडलेल्या भेगा अथवा टाचा ठीक होतात. तसेच यामुळे आपल्या पायांमधील संक्रमण किंवा बुरशी देखील दूर होते, तर आपले पाय दुखणे देखील त्वरित थांबते.

प्रतीकात्मक चित्र

तसेच अंतर्गत वेदनांमध्ये देखील कापूर तेल एक प्रभावी औषध आहे. शरीराच्या कुठल्याही भागामध्ये वेदना होत असल्यास, कापराच्या कोमट तेलाने मालिश केल्यास आपल्याला त्वरित आराम मिळतो.

monika

Leave a Reply

Your email address will not be published.