उन्हाळ्यात करा भरपूर काकडीचे सेवन…वजन कमी करण्यासोबतच अनेक अश्यर्यकारक फायदे होतील…या पद्धतीने सेवन केल्यास…

पाणीदार काकडी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच सर्वत्र काकडीचे उत्पादन मोठ्याप्रमणात घेतले जाते. काकडीचा सलाडमध्ये वापर होत असला तरी आरोग्याच्या दृष्टीनेही काकडी फार गुणकारी आहे. काकडीत व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

काकडीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सिलिकॉनचा स्तर उच्च असल्याने जगभरातील स्पा केंद्रांमध्ये काकडीवर आधारित उपचाराला महत्व आहे. काकडीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते. काकडीचा रस काढून चेहरा, हात, पायावर लावल्यास त्वचा कोमल होते. सौंदर्यामध्ये वृद्धी होते.

काकडीच्या रसामध्ये थोडी साखर मिसळून हा रस पिल्यास लघवी साफ होते. जेवणासोबत काकडीचे सेवन केल्यास जेवण चांगल्याप्रकारे पचन होते. काकडीचा रस उच्च आणि कमी रक्तदाबामध्ये लाभदायक आहे. काकडीच्या नियमित सेवनाने केस लांब होतात. काकडीतील सिलिकॉन आणि सल्फर तत्व केस वाढवण्यात सहायक ठरतात.

अमेरिकत बर्गरमध्ये काकडीचा सर्वाधिक वापर केला जातो. पाणी पिण्याऐवजी काकडी खाल्ली तरी चालू शकते. कारण काकडीत ९० टक्के पाणी असते. काकडीचे नियमित सेवन केल्यास शरीरातील पाण्याची मात्रा योग्य राहते.

यामुळे पोटाचे आजार होत नाहीत. पचनक्रिया व्यवस्थित राहते. काकडीच्या सेवनाने दररोज आवश्यक असलेलेले दहा टक्के व्हिटॅमिन सी मिळते. काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याखाली डार्क सर्कल नष्ट होतात.

दररोज काकडीच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची गती नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत होतात.

काकडीचे सेवन केल्यास शरीरातील तापमान नियंत्रित राहते. उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल तर काकडी लावल्यास त्वचा तजेलदार होते. काकडीच्या सेवनाने मुतखड्याची समस्या दूर होते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणत व्हिटॅमिन असतात. शरीराला दररोज आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता काकडी पूर्ण करते. यातील ए, बी आणि सी व्हिटॅमिनमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

तसेच अनेक रिसर्चमध्ये हे आढळलं आहे की, काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करणं आणि मधुमेहातील काही कॉम्प्लिकेशन्स रोखण्यात मदत होते. पेशी योग्य पद्धतीने काम करू शकतात. रिसर्चनुसार,

काकडीमुळे रक्तातील शर्कराचा स्तर प्रभावीपणे कमी करणं आणि नियंत्रित राहिल्याचं आढळलं होतं. मधुमेहाच्या रूग्णांनी काकडीचं साल नक्की खावं कारण काकडीच्या सालामध्ये जास्तकरून मधुमेहाशीनिगडीत रोग बरे करण्याचे गुण आहेत. काकडीमध्ये मधुमेहातील साखर कमी होण्यास मदत होते. याशिवाय काकडीतील ऑक्सीडंट्स तणावही कमी करतात. आपल्याला अनेक अजरांपासून दूर ठेवण्याचे काम करते .


Posted

in

by

Tags: