जर आपल्या सुद्धा पोटात सतत गॅस किंवा पोटाच्या कोणत्याही समस्या येत असतील..तर आजच करा हळदी आणि ओव्यांपासून हे उपाय

ऍसिडिटी अथवा आम्लपित्त ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. बऱ्याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना ऍसिडिटीचा नेहमी त्रास होतो. आम्लपित्त अथवा ऍसिडिटी म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल

(आंबट द्रव) तयार होणे. हे आम्ल अन्न पचनासाठी अत्यंत आवश्‍यक असते. परंतु, त्याच्या अति जास्त प्रमाणामुळे आम्लपित्त अथवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो.
जर आपल्या सुद्धा पोटात सतत गॅस किंवा पोटाच्या कोणत्याही समस्या येत असतील..तर आजच करा हळदी आणि ओव्यांपासून हे उपाय

सतत जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणे. तेलकट पदार्थ खाणे. अनियमित जेवणाच्या सवयी, जेवण्याच्या अनियमित वेळा, जागरण, मानसिक ताण -तणाव, सततची काळजी व चिंता, सततची घाई, गडबड या कारणांमुळे ऍसिडिटी होऊ शकते. तसेच धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन यामुळेसुद्धा ऍसिडिटी होऊ शकते.

काही औषधांमुळेसुद्धा ऍसिडिटी वाढू शकते, उदा. अन्टिबायोटीक, एस्पिरीन, सांधेदुखीची औषधे, वेदनाशामक (पेन किलर) औषधे. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये आपले जीवनमान खूप बदललेले आहे. नवनवीन शोधांमुळे कामाचे, खाण्याच्या आवडींचे, पेय पदार्थ या सर्वांमध्ये फार बदल झाला आहे. तसेच व्यवसाय,

धंदा, नोकरी यामुळे कामाच्या स्वरूपातही बदल झाला आहे. आपल्या पोटात औषधी, खाद्य पदार्थांमधली भेसळ, प्रदूषण यामुळे शरीरात अपायकारक अशी अनेक कृत्रिम रसायने जातात. निसर्ग नियमाप्रमाणे झोपणे व उठणे यातही बदल झाला आहे. या सर्व बाबींचा शरीरावर कमी-अधिक परिणाम होऊन आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.

पण आपल्या पोटाच्या कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी मसाले आणि औषधी वनस्पती खूप प्रभावी आहेत. यामुळे आम्लता आणि पाचक विकार दूर होण्यास मदत होते. वास्तविक, घरगुती उपचार दीर्घकाळापर्यंत ऍसिडिटीची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतात. यासाठी आपण हळद आणि आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा ओवा वापरू शकता.

हळद आणि ओव्याचे पाणी:-


हळद:-

हळद अनेक पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असते. ही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर देखील आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आपल्या शरीरात साठलेले विष बाहेर येते. तसेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि चयापचय संतुलित राहते.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्सेसमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार अ‍ॅसिडिटीविरूद्ध हळदीच्या परिणामाकडेही पाहिले गेले आहे. संशोधनानुसार हळदीमध्ये सापडलेला कर्क्युमिन कंपाऊंड लैंगिकदृष्ट्या कार्यशील रहाण्यासाठी देखील फयदेशीर आहे. तसेच हे एसिड ओहोटी आणि अपचन विरूद्ध संरक्षण करण्यास देखील मदत करते.

ओवा:-


ओवा खाण्याचे फायदे जे जे आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते. याचं कारण ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात.

त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर करा. जेवणानंतर ओव्या मुखवास खाण्याने तुमच्या पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधार होऊ शकतो. पावसाळ्यात भजी अथवा इतर तळलेले पदार्थांचा बेत नेहमीच केला जातो. अशावेळी ओवा (Carom Seeds) खाण्याने चांगला आराम मिळू शकतो.

कामवासना उत्तेजित करण्यासाठी ओवा फार मदत करतो.  स्त्री व पुरूष अशा दोघांमध्येही सेक्स ची भावना उत्तेजित करणार्‍या हार्मोन्सचे योग्य प्रमाण राखण्याचे काम ओवा करते.
अती प्रमाणात जेवण झाल्यास अथवा अपथ्यकारक पदार्थ खाण्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅस झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादे अॅंटासिड घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळू शकतो. कारण ओव्याने तुमच्या पोटातील गॅस लगेच कमी होण्यास मदत होते.

पित्त आणि उलटी:-

पित्ताचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी हितकारक आहे. ओवा खाण्याचे फायदे जाणून घेताना ओव्याचा हा महत्त्वाचा फायदा मुळीच विसरून चालणार नाही. यासाठी ओवा, सैधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्या.

वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सैंधव टाकून प्या. ज्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.


Posted

in

by

Tags: