काय आपल्या सुद्धा घरात अति प्रमाणत मच्छर झाले आहेत…तर आजचं करा हे घरगुती उपाय…डेंग्यू, मलेरियापासून होईल बचाव

वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत. या आजारांमध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रामुख्याने समावेश असतो.

आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.

लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता. याने तुम्हाला डास चावणार नाहीत.

घरात डास पळवणाऱ्या कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि 15 ते 20 मिनिटं त्याचा धूर होऊ द्या. डास पळवून लावण्यासाठी याचा सर्वात जास्त फायदा होतो.

कापुर किंवा कापुरचा धूर हा डास मारण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी योग्य आहे. घरात दारे खिडक्या बंद करून कापुर जाळा, १० – १५ मिनीट हा धूर घरात राहुद्या. डास मारतील किंवा पळून जातील. डास मारण्याचे जे काही घरगुती उपाय आहेत त्यातील हा सर्वात सोपा आणि किफायतशीर उपाय आहे.

यांखेरीस कापुर वापरुन डास मारण्याचे आणखी बरेच घरगुती उपाय तुम्ही करू शकता. जसे की कापुर बारीक करून त्यामध्ये हार्डवेअर च्या दुकानात मिळणारे तरपिन तेल मिसळा. कापुरची केलेली पुड त्या तेलात पुर्णपणे विरघळली आहे का याची खात्री करून घ्या आणि हे तयार केलेलं मिश्रण घरातील जुण्या एखाद्या ऑल आऊट च्या किंवा इतर कोणत्या कंपनीच्या रिफील मध्ये भरा आणि रिफील लाऊन टाका. हा उपाय तुमच्या आरोग्यास हानिकारक नसून या मधील कापुर डासांबरोबर इतर किटके देखील मारेल.

या व्यतिरिक्त संध्याकाळी जर तुम्ही घरात धूप वगैरे जाळत असाल तर त्यामध्ये कापुर टाकला तरी घरातील डास नियंत्रण होईल.

लवंग तेल:-

लवंग ही जशी खोकल्यासारख्या शारीरिक व्याधींसाठी उपयुक्त आहे. त्याच प्रमाणे लवंग तेलाचा उपयोग तुम्ही डास मारण्याचे घरगुती उपाय म्हणून देखील करू शकता, त्यासाठी तुम्हाला लवंग तेल आणि समप्रमाणात खोबरेल तेल एकत्रित करावे लागेल. आणि हे केलेलं मिश्रण तुम्ही अंगावर लाऊ शकता. हे लवंग तेल आणि खोबरेल तेलाचे मिश्रण अंगावर लावल्याने तुम्हाला डास चावणार नाहीत. हे तेल तुमच्या त्वचेला लावल्या नंतर साधारण ४ – ५ तास याचा असर राहील आणि तुम्हाला डास चावणार नाहीत.

लसूण – डास पळवण्यासाठी उपयुक्त:

लसूण हे मानवी शरीरासाठी गुणकारी आहे. हार्ट अटॅक च्या पेशंट ला लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, ज्यांचा शरीरात कोलेस्ट्रॉल चे प्रमाण जास्त आहे आशांनी लसूण नियमित खाल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. यांसारख्या अनेक गोष्टींसाठी लसूण उपयुक्त आहे. पण त्याच बरोबर डास मारण्याचे घरगुती उपाय जे तुम्ही करू इच्छिता त्यासाठी देखील लसूण उपयुक्त आहे.

लसणाच्या वासाने डास तुमच्या पसून दूर जातील. लसणाचा वास हा उग्र असतो ज्यामुळे डास जवळ येत नाहीत. लसूण बारीक करून तो पाण्यात टाकून उकाळा आणि घरात ज्या ठिकाणी मच्छर असतील अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे तिथे लसणाचा उग्र वास जाईल आणि डास पळून जातील.

कडूलिंब हे माणसाचे शरीर सदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. ह्याच कडूलिंबाचा उपयोग आपल्याला डास मारण्यासाठी घरगुती उपाय म्हणून देखील करता येऊ शकतो. कडूलिंबाचे तेल खोबरेल तेलात मिसळून अंगाला लावल्यास डास तुमच्या आजूबाजूला फिरकणार पण नाहीत.

कडूलिंबाचा वास तुम्हाला डासांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. अशा प्रकारच्या मिश्रित तेलाचा परिणाम म्हणून हे तेल लावल्यावर कमीत कमी ६ ते ७ तास तरी डास तुम्हाला चावणार नाहीत. यांखेरीस कडूलिंबापासून अन्य उपाय म्हणजे कडूलिंबाचा रस तुम्ही रिफिल मध्ये घालून देखील वापरू शकता.

तुळस ही मच्छर घरात येण्यापासून रोकते, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. तुळस ही दरात किंवा घराच्या खिडकीत एखाद्या कुंडीत ठेवा. आयुर्वेदात तुळशीचे जे महत्व सांगितले आहे ते काही उगाच नाही. तुळस दारात किंवा खिडकीत असल्याने घरच्या आजूबाजूला डासांची उत्पती कमी होते आणि परिणामी घरात डास जास्त होत नाहीत.


Posted

in

by

Tags: