जर आपल्या सुद्धा चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, पिंपल्स, वांग असेल….तर आजचं करा हा घरगुती उपाय…परिणाम आपल्या समोर असतील

प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या सौंदर्याला मारक ठरतात. त्यामुळे घालवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी बाजारातील खूप महागडे प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण याचा कालांतराने दुष्परिणाम होऊ लागतो.

अशावेळी सुरकुत्या घालवण्यासाठी नेमके काय करावे? तर स्वयंपाकघरातील हे पदार्थ सुरकुत्या कमी करण्यास मदत करतील आणि त्याचे काही साईड इफेक्ट्सही नाहीत.

आज आम्ही तुम्हाला सुरकुत्यापासून मुक्त होण्याचे काही मार्ग सांगणार आहोत. या घरगुती उपचारांच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि काही महिन्यांतच तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल. तर पहा कोणते आहेत ते पदार्थ…

कोरफड:- कोरफडीचा गर (अॅलोव्हेरा जेल) चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा, स्वच्छ आणि हायड्रेट होत असते. अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. कोरपडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी कोरपडीचा गर उपयुक्त असतो.

केळीची पेस्ट

केळ्याचा फेस मास्क लावल्याने चेहराही सुधारतो आणि सुरकुत्या दूर होतात. त्वचेसाठी केळं अतिशय उत्तम. यात अॅँटी एजिंग, व्हिटॉमिन ए आणि बी असल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. पिकलेले केळं कुस्करा. त्यात मध आणि गुलाबजल घाला. त्यानंतर त्यात दही घाला. चेहऱ्याला पेस्ट लावण्यानंतर १० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

खोबरेल तेल

चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असल्यास खोबरेल तेल उपयोगी पडते. खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून खोबरेल तेल हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉश्चराइजर प्रमाणे काम करते.

यामुळे त्वचा मुलायम बनते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा.

हरभऱ्याचे पीठ:-

ळीचे पीठ त्वचेला लावल्यास डाग जाऊन त्वचा गोरी व कांतीमान होते. इसब, सांसर्गिक त्वचारोग, खरूज यावर हे पीठ उपकारक असते. मुरमेही जातात. यासाठी पीठ दह्यात भिजवावे व त्याचा लेप चेह-यावर देऊन थोडा वेळ ठेवावा तसेच चण्याच्या पिठाने केस धुतल्यास ते मऊ व स्वच्छ होऊन केसाचे रोग होत नाहीत.

चंदन पेस्ट

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अॅन्टीबॅक्टेरियल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारी बॅक्टेरिया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. या लेपामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी होते.

सुरकुत्या घालवण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे बोटॉक्स. त्वचा केवळ कोलाजेन कमी झाल्यामुळे सैल पडते आणि सुरकुतते असं नाही, तर वारंवार हसणे, डोळे मिचकावणे, आठय़ा घालणे, भुवया आक्रसणे अशा विविध भावदर्शक स्नायूंच्या हालचालींनीसुद्धा सुरकुत्या पडतात. हे स्नायू शिथिल करायचं काम बोटॉक्स करतं. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या जंतूंपासून मिळणारा हा

पदार्थ त्वचेखाली इंजेक्शनच्या रूपात दिल्यावर तिथले स्नायू शिथिल पडतात आणि चेहरा गुळगुळीत दिसायला लागतो. मात्र अशा चेहऱ्यावर भावभावनांचा खेळ दिसू शकत नाही. अनेक फिल्मस्टार्स ही ट्रीटमेंट करून घेतल्यावर पुतळ्यासारखे भावशून्य का दिसतात हे आता समजलंच असेल! बोटॉक्सचा परिणाम ६ महिने टिकतो. त्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट घ्यावी लागते.


Posted

in

by

Tags: