हेमा मालिनी धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नींबद्दल करते असा विचार….आणि यामुळेच धर्मेंद्रने मुस्लिम धर्म स्वीकारला होता

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्रची प्रेमकथा कुणापासून लपून राहिलेली नाही. लग्न करूनही धर्मेंद्रचे मन हे हेमा मालिनीवर फिदा झाले आणि त्यांनी हेमा मालिनीशी लग्न केले.

परंतु आपल्याला कदाचित माहित नसेल पण हेमा मालिनीची आई या नात्याविरूद्ध होती आणि हेमा मालिनीने धर्मेंद्रशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. कारण धर्मेंद्र आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले सुद्धा होती.
धर्म बदलला होता:-

हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने आपला धर्म बदलला होता. वास्तविक धर्मेंद्रला आपली पहिली पत्नी प्रकाश कौरशी घटस्फोट घ्यायचा नव्हता. अशा परिस्थितीत धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला आणि तो मुस्लिम झाला.

पण आपल्याला आश्यर्य वाटेल की लग्नानंतर हेमा मालिनीने धर्मेंद्रला कधीही त्यांच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्यास भाग पाडले नाही आणि दोन मुले म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओलपासून देखील तिने वेगळे केले नाही.

आपल्या लग्नाचा संदर्भ देताना हेमा मालिनीने एका मुलाखतीत सांगितले की मी धरम जीशी लग्न केले होते. पण या लग्नामुळे कुणालाही दुखावले जाऊ नये अशी माझी इच्छा होती.

त्याच्या पहिल्या पत्नीने आणि त्याच्या मुलांनी कधीही माझा बद्दल संताप किंवा राग व्यक्त केला नाही. लग्नानंतरही मी धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या कुटुंबापासून  कधीही वेगळे करण्याचा प्रयन्त केला नाही.

पण दुसर्‍या एका मुलाखतीत हेमा मालिनीने तिच्या प्रेमकथेबद्दल उघडपणे सांगितले की जेव्हा मी धरमला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला कळले की तो माझ्यासाठीच बनला आहे आणि मला याचा व्यक्तीबरोबर माझे आयुष्य व्यतीत करायचे आहे असा निर्णय घेतला होता.

धर्मेंद्रने 1954 साली प्रकाश कौरशी लग्न केले. सन 1980 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न झाले. पण धर्मेंद्रने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. लग्नानंतरही धर्मेंद्र आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांबरोबर वेळ घालवायचा आणि हेमा मालिनीला यात काहीच हरकत नव्हती.


Posted

in

by

Tags: