जर आपल्याला सुद्धा अशक्तपणा, लै-गिंक समस्या, स्टॅमिना यासारख्या समस्या असतील…तर आजच करा याप्रकारे अक्रोडाचे सेवन.

आहारा संबंधित अडचणींमुळे बरेच रोग आपल्या शरीरात जात असतात. त्यामध्ये अनेक गंभीर आजारांचा देखील समावेश आहे. म्हणूनच आपल्या शरीराला पोषकद्रव्ये आवश्यक असतात आणि हे पोषक घटक आपल्याला फळे, ताज्या भाज्या आणि ड्राय फ्रुट्स मधून मिळू शकतात.

तसे, ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत, हे सर्वांनाच माहित आहे कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो.

पण आज आम्ही आपल्याला अक्रोडचे फायदे सांगणार आहोत, जर आपण सुद्धा त्याचे दुधासोबत सेवन केले तर त्याचा आपल्या शरीराला चांगला फायदा होतो. चला तर मग दुधासोबत आक्रोडचे सेवन केल्यास आपल्या शरीराला कोणते फायदे मिळू शकतात ते आपण जाणून घेऊ.

प्रतीकात्मक चित्र

ह्रदय विकाराचा धोका कमी होतो:-

अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आपले ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. अक्रोड खाण्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. अक्रोडामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही ज्यामुळे आपल्याला हृदय विकार होण्याचा धोका कमी होतो.

प्रतीकात्मक चित्र

वजन नियंत्रणात राहते:-

आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे वजनावर नियंत्रण ठेवणंं कठीण जातं. पुढे मग मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग  समस्या निर्माण झाल्यास डॉक्टर आपल्याला वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. पण जर आपण अक्रोडाचे दुधासोबत सेवन केले तर आपल्याला वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना सुद्धा अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.

प्रतीकात्मक चित्र

मेंदूचे कार्य सुरळीत होते:-

अक्रोड हे फळ आपल्याला आकारामध्ये सुद्धा मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसते. पण एवढंच नाही तर दररोज अक्रोड खाण्यामुळे आपल्या मेंदूचे कार्यदेखील सुरळीत होऊ शकते. अक्रोडामध्ये असे काही आरोग्यदायी घटक असतात ज्यामुळे आपली समरणशक्ती देखील वाढू शकते. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं.

प्रतीकात्मक चित्र

कॅन्सरचा धोका कमी होतो:-

अक्रोडातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या रोगापासून आपले रक्षण होऊ शकते. आजकाल या रोगाचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे जर आपल्याला यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर दररोज सकाळी सुकामेवा सेवन करण्याची सवय लावा. सुकामेव्यामध्ये इतर पदार्थांसोबत अक्रोडाचा समावेश जरूर करा.

शूक्राणूंची संख्या वाढते:-

अक्रोड खाण्यामुळे पुरूषांच्या शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढते. बऱ्याचदा स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे पुरूषांमध्ये वंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जर आपण बाळासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज अक्रोड अवश्य खा. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आणि लै-गिक आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.

प्रतीकात्मक चित्र

अक्रोड आपल्याला लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. तसेच अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी देखील आपल्याला मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं आपल्या हदयाच्या आरोग्यसाठी महत्वाचे मानले जाते. तसेच अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं.


Posted

in

by

Tags: