सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे की थंड पाणी…जाणून घ्या कोणते पाणी आपल्यासाठी फायदेशीर आहे…आपली ही एक चूक आपल्याला महागात पडू शकते

पाणी म्हणजे आपल्या जीवनाचा एक सर्वात मोठा आधार आहे, एकवेळ अन्न नसेल तर माणूस काही काळ तरी जिवंत राहू शकतोच पण जर पाणी नसले तर मात्र आपले जगणे असह्य होऊन जाते. असे हे पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
जसेकी आपल्याला माहीत आहे की आपले शरीर हे 70% पाण्यापासून बनले आहे. पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आणि पौष्टिक तत्व आहे. यासाठीच पाण्याला जीवन असे म्हंटले गेले आहे. पण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे सर्वात फायदेशीर आहे हे सिद्ध झाले आहे.
आयुर्वेदिक अनुसार सकाळी रिकाम्या पोटी पाणी वेदनाशामक सिद्ध होते. दम, कैंसर, वजन वाढणे यासारख्या समस्या मध्ये फायदेशीर ठरते. परंतु सकाळी पाणी पिण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे. ती म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला थंड पाणी पिण्याच्या एवजी कोमट पाणी प्यायले पाहिजे. हलकेसे गरम पाणी आपल्या पचनक्रियेसाठी फायदेशीर असते.
याच सोबत जर पाणी आपण हळूहळू प्यायले तर आपल्या तोंडातील सर्व लाळ त्या पाण्यासोबत मिक्स होऊन आपल्या पोटामध्ये प्रवेश करेल. ज्यामुळे आपले डायजेशन सिस्टम खराब होणार नाही आणि कोलेस्ट्रोल, हार्ट अटैक सारखे रोग आपल्या पासून कायमचे दूर राहतील. आज आम्ही आपल्याला या आर्टिकल मध्ये सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत हे सांगणार आहोत. जे समजल्यावर रोज सकाळी आपण रिकाम्या पोटी सर्वात पहिले कोमट पाणी प्यायला सुरुवात कराल.
पण प्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की थंड पाणी पिण्यामुळे मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्याची कार्यक्षमता कमी होते. तसेच, थंड पाणी पिण्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात श्लेष्मा निर्माण होते, जे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही.
तसेच एका अहवालानुसार थंड पाणी पिण्यामुळे रक्तपेशी कमी होतात. तसेच आपली पाचक प्रणाली मंद होते. यामुळे जर आपण सकाळी थंड पाणी पीत असाल तर ते त्वरित बंद करावे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने किती कोमट पाणी प्यावे असा सुद्धा प्रश्न पडतो.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी तत्व आणि विषारी पदार्थ बाहेर जातात. याच सोबत हे पाणी पोट गैसमुळे फुगले असेल तर त्यापासून आपल्याला आराम देईल. यासाठी आपण सकाळी जेवढे पाणी प्याल तेवढी आपल्या शरीराला शुद्धी मिळेल.
तसेच गरम पाणी पिताना त्यातून जी वाफ मिळते त्यामुळे आपल्या चोंडलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची आपली तक्रारही दूर होते. पाणी पिताना ग्लास अशा पद्दतीने पकडा की, त्या पाण्याची वाफ आपल्या घशात जाईल.
गरम पाण्याची वाफ श्वासावाटे घशात गेल्याने सायनस आणि सायनस सारख्या आजारामुळे होणारी डोकेदुखी थांबवते. तसेच ते गरम पाणी घशातून जाताना घशात होणारी खवखव किंवा सर्दीमुळे झालेली जखम बरी करते. आपण गरम पाण्यात विक्स टाकून त्याचा वाफारा घेतल्यानेही तुम्हाला आराम पडू शकतो. तर या सर्दी-पडसे, खोकला, सायनस या आजारांपासून वाचण्यासाठी कायम गरम पाणी पिणे अतिउत्तमच!
गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.
जर तुम्ही थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्यास सुरूवात केली तर आतड्यांना आक्रसण्यात मदत होते. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा माणसाच्या शरीरातील आतड्यांमध्ये फसलेल्या गोष्टी पूर्णपणे शरीराबाहेर फेकल्या जातात. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही दररोज सकाळी न चुकता पाणी पिणं कधीही चांगलं ठरू शकतं. तसंच चहा आणि कॉफीमध्ये असणा-या कॉफीनमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणूनच कॉफीनयुक्त पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा गरम पाणी प्यावे.
जेव्हा तुम्ही सात ते आठ तास झोपून उठता तेव्ही सर्वप्रथम तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते. लिंबूमध्ये विटामिन ‘सी’ असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्यामुळे सकाळी सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध टाकून प्यायल्यास वजन नियंत्रणात आणण्यास किंवा कमी करण्यात मदत होते. तसेच गरम पाण्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्था चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे गरम पाणी पिणारी लोकांमध्ये तणावाचे प्रमाण कमी असते आणि मन शांत असते. या गरम पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स निघून जाऊन स्वास्थ सर्वोत्तम राहण्यास मदत होते.
त्यामुळे जर आपण दिवस भर कोमट पाण्याचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.