काय आपले सुद्धा ओठ काळे पडले आहेत…तर आजच करा हा उपाय…आपले ओठ काही दिवसांतच होतील गुलाबीपान…पण या गोष्टी पासून रहा दूर

आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो आणि आपल्याला माहित आहे की आपल्या चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे आपले ओठ. सुंदर ओठांसाठी आपल्याला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजिबात अजिबात धुम्रपान करू नये. दुसरं म्हणजे कमी कॉफी प्यावी.
घरातून बाहेर पडताना चांगल्या दर्जाचं SPF लिप बाम वापरणं अत्यंत गरजेचं आहे. पण जर इतकं करूनही जर आपले ओठ काळे पडत असतील तर त्यासाठी आम्ही आपल्याला काळे ओठ गुलाबी होण्यासाठी काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे आपले ओठ पहिल्यासारखेच गुलाबी राहतील.
ओठ लाल होण्यासाठी उपाय काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय अनेक आहेत. खरं तर ओठ काळे का पडतात हे आधी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय आपण पाहूया आणि त्याआधी आपण जाणून घेऊया की आपले ओठ काळे का पडतात आणि त्याची काही महत्त्वाची कारणे.
ओठ काळे का पडतात असा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतो. पण त्याचीही काही अनेक कारणे आहेत. ही कारणे काही नैसर्गिक आहेत तर काही आपण स्वतःहून ओढवून घेतलेली आहेत.
त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपला सतत उन्हात असलेला वावर. आपण बऱ्याचदा उन्हात फिरताना त्वचेची काळजी घेतो पण ओठांची काळजी घेत नाही. तसंच आपल्याला काही अलर्जी असतील तर त्यामुळेही आपले ओठ काळे पडतात. त्याशिवाय मुंबईसारख्या शहरांमध्ये असलेले प्रदूषणही ओठ काळे पडण्याला जबाबदार आहे.
आपल्याला ओठ गुलाबी राखून ठेवायचे असतील तर आपण आपले कॉफी पिण्याचं प्रमाणही कमी करायला हवे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांनी ओठांवर सतत लिपस्टिक लावणे. लिपस्टिकमध्ये अनेक केमिकल्स असतात आणि आपण जास्त वेळ ओठांवर सतत लिपस्टिक लावून ठेवल्यास ओठांवर नैसर्गिक गुलाबी रंग निघून जातो
काळे ओठ पडल्यानंतर गुलाबी कसे करावे असा प्रश्न नेहमीच असतो. पण ओठ गुलाबी करण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करता येतात. त्यासाठी आपल्याला वेगळे काही प्रयोग करायची गरज नाही. आम्ही आपल्याला इथे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
प्रथम आपण बीटचा रस काढून घ्यावा. आपण नुसता त्याचा रसही आपल्या ओठांना लावून ओठांचा मसाज करू शकता अथवा आपण त्यामध्ये मध घालूनही आपल्या ओठांना लावल्यास त्याचा योग्य परिणाम आपल्याला काही दिवसातच दिसून येईल. आपले ओठ गुलाबी करण्यासाठी बीटचा रस हा चांगला पर्याय आहे. नैसर्गिक एक्स्फोलिएटर असल्याने काळ्या ओठांवर याचा चांगला परिणाम होतो.
तसेच लिंबाचा रस आपल्या केस आणि त्वचेसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. पण याचा परिणाम ओठांवरही खूपच चांगला होतो. लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब ओठावर लाऊन मसाज करावा. त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. ओठांवरील काळेपणा कमी होतो आणि ओठ मऊ मुलायम होतात.
केशर आणि दही:-आपल्या स्वयंपाकघरामध्ये केशर असल्यास, त्याचे दोन ते तीन धागे दह्यात घाला. दह्यामध्ये 15-20 मिनिट्स केसर तसंच राहू द्या. ही पेस्ट मुलायमपणे तुमच्या ओठांना लावा आणि मग मसाज करा. त्वरीत याचा परिणाम तुम्हाला दिसेल.
लिंबाच्या रसामध्ये:ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटादेखील खूपच फायदेशीर आहे. बटाट्याचा रस काढून घ्या आणि रोज हा रस ओठाला लावा. रोज असं केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच याचा फरक जाणवेल. बटाटा हा शरीरावरील काळेपणा काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो. यातील एक्सफोलिएट करणारे घटक अधिक फायदा करून देतात.
बटर अर्थात मस्का वा लोण्याचा वापर हा ओठांचा नैसर्गिक रंग परत आणण्यासाठी करता येऊ शकतो. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही ओठांवर बटर लावा. घरी केलेलं लोणी असेल तर जास्तच चांगलं. यामुळे तुमचे ओठ खूपच सुंदर होतात.
तसेच आपले ओठ काळे पडू नयेत यासाठी अति प्रमाणात चहा, कॉफी पिणं टाळा. तसेच धुम्रपान करु नका. हेल्दी डाएट फॉलो करा. तसेच शक्य तितक्या नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा.