रोज बडीशोप घातलेलं दूध प्याल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल….फक्त करा ही कृती आणि उपाय

प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात अगदी सहज आढणा-या बडीशेपचा साधारणत: तिच्या गोड स्वाद व सुगंधी गुणधर्मांमुळे माऊथ फ्रेशनरच्या रूपात उपयोग केला जातो. अनेक पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केल्या जाणा-या वापरासोबतच औषध म्हणून देखील बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप मध्ये आढणारे फायबर व पोषक तत्व पोटासाठी खूप लाभदायक व चांगले मानले जातात. पण याच बडीशेपचे दुधासोबत सेवन केल्यामुळे मिळणारे लाभ देखील दुप्पट होतात.

दूध व बडीशेप अशा दोन्ही तत्वांमधील आरोग्यवर्धक फायदे शरीराला मिळतात. बडीशेप घातलेले दूध बनवणे अत्यंत सोपे आहे. एक ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घालून ते दूध चांगले उकळवून घ्या. नंतर हे दूध प्या. चला तर जाणून घेऊया हे स्पेशल दूध पिण्याचे फायदे

जर तुम्ही रोज साध्या दुधाचे सेवन करत असाल तर शरीराला पोषक तत्वांची पूर्ती करण्यासाठी बडीशेपच्या दुधाचे सेवन करणे सुरू करा. दुधातच बडीशेप घालून ते उकळवून तुम्ही हे हेल्दी ड्रिंक बनवू शकता. हे प्यायल्याने वरीलपैकी अनेक आरोग्यवर्धक फायदे मिळवू शकता.

अस्थमा:-

तसंच बडीशेपच्या दुधातील फाइटोन्यूट्रिएंट्स गुणधर्म श्वासाशी संबंधित आजार व अस्थमाशी लढा देण्यास मदत करतात व त्यांची लक्षणे कमी करतात.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं:-

तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ ३० मिनिटं एक चमचा बडीशेप खावी.  बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते. सकाळी उठल्यानंतर दुधासोबत बडीशोपचं सेवन करणंही कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.

हृदयरोगांसाठी व इतर आजारांसाठी उपयुक्त:-

बडीशेपमधील पॉलीफेनोल अ‍ॅंटीऑक्सिडंट, रसोमिर्निक अ‍ॅसिड, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड, क्वेरसेटिन व एपिजेनिन सारखे तत्व असतात ज्याचा आरोग्यावर भरपूर परिणाम होतो. एका अध्ययनानुसार, अ‍ॅंटीऑक्सिडंटने परिपूर्ण असणा-या आहाराचे सेवन करणा-

या लोकांना लठ्ठपणा, कॅन्सर, न्यूरो प्रॉब्लम व टाइप २ डायबिटीज यासारख्या आजारांशी लढा देण्यास मदत मिळते. तर बडीशेप मध्ये आढळणारे फायबर, पोटॅशियम व मॅग्नेशियम हृदयरोगांचा धोका कमी करतात. जे की चुकीच्या लाइफस्टाइलमुळे हमखास होतात. बडीशेप शरीराची कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास कारक ठरते.

पोटाशी निगडीत समस्या व हिमोग्लोबिनसाठी उपयुक्त:-

बडीशेप मध्ये असणा-या तेलामुळे अपचन, सूज व बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे पोटाशी निगडीत सर्व आजार दूर करण्यासाठी बडीशेपचे दूध लाभदायक मानले जाते. बडीशेप मध्ये असलेल्या एस्ट्रैगल और एनेथोल या गुणधर्मांमुळे पोटाचे आजार जसं की मुरडा पडणे,

वेदना, गॅस्ट्रक पेन यावर हे दूध प्रभावी औषध मानले जाते. मसालेदार व तेलकट खाद्यपदार्थांमुळे होणारी अ‍ॅसिडीटी व सूज कमी करण्यास देखील बडीशेप मोलाची मदत करते. तसंच बडीशेपमधील फायबर व मॅग्नेशियम हे घटक शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि एनीमियाशी लढा देण्यासही लाभदायक ठरतात.

वेट लॉस व खोकल्यासाठी:-

फायबरने परिपूर्ण अशा बडीशेपचे सेवन केल्यामुळे आपल्याला बराच काळ भूक लागत नाही. ही शरीराचा मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते आणि आराम करत असताना देखील कॅलरीज बर्न करण्याचे काम करते. बडीशेप खाल्ल्याने भूक कंट्रोलमध्ये राहते.

जर तुम्ही लठ्ठपणा कमी करू इच्छित असाल तर १ चमचा बडीशेप रोज खा. एका अध्ययनानुसार, कॅलरी कमी करण्यासाठी महिलांनी लंच करण्याआधी बडीशेपचे दूध प्यायल्यास अनेक लाभ मिळतात. तसंच बडीशेप भाजून खडीसाखरेसोबत खाल्ल्यामुळे घसा साफ होतो. खोकल्याची समस्याही दूर होते. याव्यतिरिक्त बडीशेप आपली स्मरणशक्ती वाढवते.

रिफ्रेश डोळ्यांसाठी व चेह-यावर चमक आणण्यासाठी:-

जर तुम्ही कमजोर व धुरकट नजर अशा डोळ्यांच्या समस्यांशी झुंज देत असाल तर मुठभर बडीशेप तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए असतं, जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर असतं. पहिल्यांदा मोतीबिंदू कमी करण्यासाठी बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जायचा.

बडीशेपचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होऊन दृष्टी तेज होते. दररोज ५ ते ६ ग्रॅम बडीशेपचे सेवन केल्यास लिवरलाही फायदे होतात. तसंच नियमित बडीशेप खाल्ल्याने आपल्या शरीराला झिंक, कॅल्शियम, सेलेनियम यासारखे मिनरल्स मिळतात. जे हार्मोन्स व ऑक्सिजनचा बॅलेन्स बनवण्यास मदत करतात. याचा थंडा प्रभाव चेह-यावर ग्लो आणतोवेदना:-

बडीशोप घातलेल्या दुधाचं सेवन केल्यास मासिक पाळीतील वेदना कमी होतात. याव्यतिरिक्त गुळ आणि बडिशोपचंही सेवन तुम्ही करू शकता.  तुम्हाला जर मुत्रमार्गात जळजळ होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खाल्यानं लगेच आराम मिळेल.

मुरुम :-

बडीशेप मध्ये असलेले एसिंशियल ऑइल व फायबर हे पोषक तत्व आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात. हे ब्लड प्युरीफायर प्रक्रियेसाठीही उपयुक्त समजले जाते. एनसीबीआयच्या एका रिसर्च अनुसार, बडीशेप मधील जीवाणुरोधी गुणधर्म आपल्या चेह-यावरील मुरूम कमी करण्यास कारक ठरतात. यामुळे नितळ, डागविरहित, साफ त्वचा मिळते आणि शरीरातील रक्त शुद्धीकरणही होते.


Posted

in

by

Tags: