रोज करा शेंगदाण्याच्या चिक्कीचे सेवन आणि या दुधर्र आजरांपासून रहा दूर…फायदे जाणून आपण सुद्धा हैराण व्हाल

आरोग्याच्या बाबतीत हिवाळा चांगला मानला जातो. या हंगामात बहुतेक लोक तीळ, गूळ आणि शेंगदाणे आणि सुकेमेवे पासून बनवलेली चविष्ट गोड चिक्की म्हणजेच गुळाची पट्टीचे सेवन करतात. याचे सेवन केवळ चवीसाठीच चांगले नव्हे तर आरोग्यदायी फायदे देखील असतात. जर आपण हिवाळ्याचा हंगामात या गुळाच्या पट्टीचे सेवन केले तर आपल्याला आरोग्याचे बरेच फायदे मिळतात.

वास्तविक, गूळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण हिवाळ्यासाठी खूप चांगले आहे. त्याचे बरेच फायदे आहेत आणि त्यापासून आपल्याला अनेक रोगांपासून मुक्तता देखील मिळते. चला जाणून घेऊया शेंगदाणा चिक्की खाण्याचे काय फायदे आहेत…

शरीर उबदार ठेवते:-

वास्तविक, शेंगदाण्याचा प्रभाव गरम असतो, म्हणूनच शरीरास त्याच्या सेवनाने उष्णता मिळते जे थंड दिवसात खूप फायदेशीर ठरते. साखरेपेक्षा गूळ हा एक नेहमीच चांगला पर्याय आहे. अशा परिस्थितीत, जे अशक्त आहेत ते गुळाचे सेवन करू शकतात.

खराब कोलेस्टेरॉल नियंत्रण:-

शेंगदाणा चिक्की खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हार्ट अटॅकचा धोकाही बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

बहुतांश लोक रोजच्या आयुष्यात कळत-नकळत इतकं फास्ट फुड किंवा जंक फुडसारखे नुकसानदायक पदार्थ खातात की यामुळे आपलं पोट तर भरतं, जीभेचे चोचले तर पुरवले जातात पण हे पदार्थ कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून हृदयाला धोका पोहचवतात.

हे हानीकारक पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही शेंगदाणा किंवा गुळ चिक्की खाऊ शकता आणि कोरोनरी आर्टरी डिसीज व हार्ट स्ट्रोकपासून बचाव करु शकता. चिक्कीमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड हृदयाची काळजी घेतात व कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते:-

तसे, चिक्की खाण्याचे बरेच फायदे आहेत. यापैकी हा देखील एक आहे की चिक्कीच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शेंगदाणा रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून कार्य करते, हिवाळ्याच्या हंगामात व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी करते. यासह, सर्दीपासून संरक्षण देखील करते.

 पचन:-

जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील किंवा अपचन होत असेल तर गुळ खाल्ल्यामुळे या समस्या दूर होतात. जर तुम्ही केमिकल कंपनीत किंवा कलर काम करत असाल तर दररोज गुळ खाणे तुमच्यासाठी लाभदायक आहे.

शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने पोटातील वेदना आणि बद्धकोष्ठता पासून सर्व पाचन समस्या दूर होतात. ज्या लोकांना सतत पोटदुखीची समस्या असते त्यांनी चिक्कीचे सेवन करावे.

वजन नियंत्रण:-

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत  असाल तर शेंगदाणे खाणे तुमच्या फायद्याचे आहे. कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट साफ राहते आणि तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

स्मरणशक्ती वाढवते-
हल्ली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपाय करतात. त्यात अनेक टॉनिक वगैरे घेतात. मात्र हे सगळं करणं आता बंद करा आणि शेंगदाण्याचे योग्यरित्या सेवन करा.

चमकणारी त्वचा:-

चिक्की शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते. तुमची त्वचा ड्राय असेल तर शेंगदाण्याने ड्राय स्कीनच्या सगळ्या समस्या दूर होतात.

बाळाच्या योग्य वाढीसाठी गरोदर महिलांनी रोजच्या आहारात गुळ खाल्ला तर त्याचे खूप फायदे होतात. ब्लड सर्कुलेशन चांगले होते. पीरियड्स मध्ये गुळ खाल्ला तर त्यामुळे कमरेचे दुखणे कमी होते.

या गोष्टी लक्षात ठेवा

मासिक पाळीच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचं सेवन करणं आवश्यक असतं. त्यामुळे अनेक समस्या दूर होतात.

– गुळ शेंगदाणे खाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो. गुळ-शेंगदाणे गरम असल्यामुळे जास्त खाणं टाळावं. – शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे चेहऱ्यावर उजाळा येतो.

 

– शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं त्यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्टसारख्या समस्या दूर होण्यासही मदत होते. – प्रोटीन आणि कॅल्शिअम असलेले शेंगदाणे आणि गुळ खाल्यामुळे दात आणि हाडं मजबुत होतात.


Posted

in

by

Tags: