हाडांमधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे लक्षण आहे कसे कसे ते जाणून घ्या  

हाडांमधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. हाडे वाजणे  हा रोगाचा एक प्रकार आहे. ज्याला क्रेपिटस म्हणतात. एखाद्या व्यक्तीची हाडे कडकड वाजत असतील आणि त्या भागात वेदना जाणवत असल्यास, तत्काळ डॉक्टरांची तपासणी करा.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीराची दोन हाडे एकाच ठिकाणी जोडली जातात  तेव्हा ती एकमेकात अडकल्याशिवाय आरामात मूव्ह करतात . हाडांची जोड मजबूत कार्टिलेज नी व्यापलेली असते,

ज्यामुळे ते सहजपणे मूव्ह  होतात आणि आवाज करत नाहीत. त्याच वेळी, जेव्हा  कार्टिलेज दुर्बल होऊ लागतो तेव्हा हाडांमधून आवाज होऊ लागतो . हाडातून येणाऱ्या या आवाजाला क्रेपिटस रोग म्हणतात.

जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर हा रोग वाढू लागतो आणि हाडांमधून अधिक आवाज येऊ लागतो. इतकेच नाही तर बर्‍याच लोकांना त्या ठिकाणी सूज देखील येते .

ऑस्टियोआर्थराइटिस म्हणजेच सांधेदुखीची समस्या देखील सामान्य होत आहे. ही समस्या सहसा हात, गुडघे,  किंवा पाठीच्या कण्यामध्ये दिसून येते. ऑस्टियोआर्थरायटिस, आर्थरायटिसचा हा आजार म्हणजेच संधिवात वृद्ध लोकांमध्ये जास्त दिसून येतो. पण आजकाल तरुणही या समस्येला तोंड देत आहेत.

ऑस्टियोआर्थराइटिस ची  समस्या असल्याचे अनेक कारणे आहेत. अधिक अल्कोहोल आणि ड्रग्जचे सेवन करणारे तरुण लवकरच या आजाराला बळी पडतात. या व्यतिरिक्त, लठ्ठपणा वाढणे देखील हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच, आपण नशा करणे टाळावे आणि आपले वजन वाढवू देऊ नये .

हे घरगुती उपचार करून पहा

आपल्याला ऑस्टियोआर्थरायटीस असल्यास किंवा हाडांमधून आवाज येत असल्यास तेलाने मालिश करा. मोहरीचे तेल तापवून हलके हाताने दररोज मालिश करा.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी गुळाचे दूध प्या. दररोज रात्री झोपेच्या आधी एक ग्लास दूध गरम करा आणि त्यात गूळ घाला. दररोज हे दूध पिण्यामुळे हाडे मजबूत होतात.

कॅल्शियम हाडांसाठी चांगले मानले जाते. म्हणूनच, आपण आपल्या आहारात कॅल्शियम समृद्ध गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत. कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास हाडांच्या आजारापासून बचाव होतो.


Posted

in

by

Tags: