ऊसाच्या रसाचे हे 4 मोठे फायदे, जाणून घ्या शरीरासाठी उसाचा रस का महत्वाचा आहे…या लोकांना तर वरदान आहे उसाचा रस

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता. त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह,

मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते. ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता आहे. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करते, हाडे मजबूत करते, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते, वजन कमी करण्यास मदत करते. याबरोबरच कावीळ आणि व्हायरल तापातही फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उसाचा रस खूप फायदेशीर असतो.

उसाचा रस प्यायला आपल्यापैकी अनेकांना आवडते. अत्यंत मधुर असा उसाचा रस क्‍वचित लोकांना आवडत नसेल. उन्हाळ्यात रस्त्यावरून ये-जा करताना अनेकदा तुम्हाला उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज रस पिण्यासाठी खेचून नेतो. त्यामुळे आपण आनंदाने उसाच्या रसाचा आस्वाद घेतात. साधारणत: मार्च ते मे महिन्यात उसाचा रस जास्त पिला जातो. कारण, असे की उन्हामुळे शरीराला पाणी जन्य पेयांची जास्त गरज भासते.

काही लोकांना उसाच्या रसातील हा गोडवा फारसा आवडत नाही. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात आणि कोलड्रिंक्‍सकडे वळतात. मात्र, कोल्ड्रिंक्‍समध्ये असणारे केमिकल आपल्या शरीराला हानीकारक असतात.

याउलट उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे पोषक असतात. गर्भवतींसाठी हे खूप उपयोगी आहे. उसाचा रस फक्त गर्मीपासून बचाव करीत नाही तर बऱ्याच आजारपणापासून दूर ठेवतो. उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशनची भीती सतत असते. उसाचा रस पिल्याने डीहायड्रेशनपासून बचाव होतो.

अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. काहीवेळा एनीमियासुद्धा असतो. या परिस्थितीत लाल पेशी कमी होतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी उसाचा रस फायदेशीर ठरत असतो. तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर हाडांना मजबूती देण्यासाठी व उर्जा देण्यासाठी उसाच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर राहील. असाचा रस दातांना संसर्ग होण्यापासून वाचवतो. यामुळे दातांना निरोगी व चमकदार ठेवण्यास मदत होते.

इलेक्‍ट्रोलाइट्‌स व पाण्याची कमतरता करते पूर्ण:-

कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅगनीजने भरपूर उसाचा रस इलेक्‍ट्रोलाइट्‌स आणि पाण्याची कमतरता पूर्ण करतो. एंटीऑक्‍सिडेंटनेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे यात असणारे फ्लेवोन हे घटक कॅंसर कोशिकांनाच्या प्रसार थांबवते. उसाचा रस पिताना आपण नेहमी काळजी घ्यायला हवी जेणे करून त्यापासून आपल्या पोटाला काही विकार व्हायला नको.

ही घ्या खबरदारी:-

रस बनवण्यासाठी वापरणारे पाणी स्वच्छ आहे का? हे तपासा

बर्फ नीट ठेवले आहे का? त्यावर माशा तर बसत नाहीत ना? याकडे लक्ष द्या

मशीनमधून काढलेला उसाचा रस लवकर प्या

फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणे टाळा

उसाच्या रसामध्ये इतर कोणतेही पेय मिसवळू नका

एका दिवशी दोन किंवा तीन ग्लासच्यावर रस पीऊ नका

जॉयंडीस सारख्या आजाराचे रुग्ण जास्त वेळा रस पीऊ शकता

रसात कॅलरी व कार्बोहायड्रेट असल्यामुळे वजन वाढते

डाखबिटीजच्या रुग्णांनी रस पिणे टाळावे.

अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. काहीवेळा एनीमिया सुद्धा असतो. या परिस्थितीत लाल पेशी कमी होत असतात. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरत असतो.जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर हाडांना मजबूती देण्यासाठी तसंच उर्जा देण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन करणं कधीपण चांगले ठरू शकते.

त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.उसाच्या रसाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे, तुमच्या दातांचा इन्फेक्शनपासून बचाव करते आणि त्यांना निरोगी व चमकदार ठेवण्यास मद होते. म्हणून उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात महत्व देण्यात आले आहे. तर तुम्ही कोल्ड्रिंक्स पीत असाल तर त्यापेक्षा नक्कीच उसाचा रस तुमच्या शरीराला पोषक असा आहे.


Posted

in

by

Tags: