गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटांसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केले होते कास्ट…परंतु सलमान खानमुळे..

गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटांसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केले होते कास्ट…परंतु सलमान खानमुळे..

संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठीयावाडी’चा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

तो पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आलियाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ‘गंगूबाई काठीयावाडी’ चा टीझर पाहून अक्षय कुमार, रणवीर सिंह पासून शाहिद कपूरपर्यंत अनेक मोठंमोठ्या कलाकारांनी आलियाचं कौतुक केलंय.

alia-bhatt-was-not-the-first-choice-for-gangubai-kathiawadi-actresses-who-played-prostitutes

पण आपणास सांगू इच्छितो कि या चित्रपटातील गंगूबाईच्या व्यक्तिरेखेसाठी आलिया भट्ट ही पहिली पसंती नव्हती. तर आलियापूर्वी या चित्रपटाची ऑफर दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि राणी मुखर्जी यांना देण्यात आली आहे होती.

पण सुरवातीला संजय लीला भन्साळी यांनी राणी मुखर्जी समवेत हा चित्रपट बनवायचे ठरवले होते. पण या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते आणि त्यामुळे राणीने हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली नाही.

alia-bhatt-was-not-the-first-choice-for-gangubai-kathiawadi-actresses-who-played-prostitutes

तसेच याआधी दीपिका पादुकोण होती पहिली पसंद पण त्यावेळी दीपिकाने विशाल भारद्वाजच्या सपना दीदी या चित्रपटाला होकार दिला हता. सपना दीदीमध्ये दीपिका पादुकोण ही एका गुंडाची भूमिका साकारणार होती आणि त्यामुळे भन्साळी यांनी गंगूबाईं या चित्रपटांसाठी तिला विचारले नाही.

alia-bhatt-was-not-the-first-choice-for-gangubai-kathiawadi-actresses-who-played-prostitutes

तसेच राम लीलामध्ये आयटम साँग केल्यावर प्रियंका चोप्रा संजय लीला भन्साळी याच्या डोक्यात बसली होती. पण त्यावेळी प्रियंकाला वेळ नव्हता कारण ती दुसऱ्या चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. तर इकडे संजय यांनी सलमान खान आणि आलिया भट्ट यांच्यासह इंशाल्लाहला हा चित्रपट करण्याची घोषणा केली.

पण नेहमीप्रमाणे सलमान खान आणि भन्साळी यांच्यात चित्रपटाबाबत मतभेद वाढले आणि सलमान खानने तो चित्रपट सोडला. पण सलमान खानचा इंशाल्लाहला हा चित्रपट करण्यासाठी आलियाने तिच्या सर्व तारखा भन्साळी याना दिल्या होत्या आणि आमिर खानच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाला सुद्धा तिने नकार दिला होता.

alia-bhatt-was-not-the-first-choice-for-gangubai-kathiawadi-actresses-who-played-prostitutes

अशा परिस्थितीत जेव्हा इंशाल्लाह थांबला तेव्हा आलिया खूप दुखी झाली आणि तिने ही वस्तुस्थिती भन्साळी यांच्यासमोर व्यक्त केली. त्याचबरोबर आलियाने भन्साळीना सांगितले की तिला तुमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची किती इच्छा आहे.

दुसरीकडे, भन्साळी याना आलियाला सुद्धा जाऊ द्यायचे नव्हते. कारण आलियामध्ये असलेले टॅलेन्ट त्यांनी तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पहिले होते. बालिका वधू नावाच्या चित्रपटामध्ये भन्साळी यांनी आलियाचा करिष्मा पहिला होता.

अखेर भन्साळी यांनी आलियासोबत गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांची घोषणा केली. या चित्रपटात प्रथमच आलिया भट्ट एक आभासी भूमिका साकारताना दिसणार आहे. पण यापूर्वी बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्रींनी अशा पात्रांसाठी आपली छाप पाडली आहे. याआधी करीना कपुर, राणी मुखर्जी, वहीदा रहमान, विद्या बालन, सुष्मिता सेन या अभिनेत्रींनी वैश्या स्त्रीची भूमिका साकारली आह

करीना कपूर - चमेली

गंगूबाई कोण होती?

असे मानले जाते की गंगूबाई गुजरातच्या काठियावाडची रहिवासी होती, म्हणून तिला गंगूबाई काठियावाडी असे संबोधले जात असे. पण तिचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होते. वयाच्या 16 व्या वर्षी गंगूबाई आपल्याच वडिलांच्या अकाउंटेंटच्या प्रेमात पडली आणि त्या मुलाशी लग्न करून ती मुंबईत पळून आली.

गंगूबाईंला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं आणि ती आशा पारेख आणि हेमा मालिनी यासारख्या अभिनेत्रींची मोठी चाहती होती. मात्र, तिचा नवरा फसवणूक करणारा ठरला आणि त्याने गंगूबाईला मुंबईतील कामठीपुरा येथील रेड लाईट भागात 500 रुपयांत विकले.

हुसैन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकात कुख्यात गुंड करीम लालाचाही उल्लेख केला आहे. पुस्तकानुसार, करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाई करीमला भेटली आणि त्याला राखी बांधून भाऊ केलं. आता करीम लालाची बहीण झाली म्हटल्यावर आपणंच तिचं कामाठीपुरामध्ये वजन वाढलं. असं म्हटलं जातं की, गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.