जाणून घ्या साबुदाण्याचे आरोग्यदायी अप्रतिम असे फायदे….वृद्ध लोकांसाठी तर वरदान आहे साबुदाणा…फक्त करा याप्रकारे त्याचे सेवन

उपवासाला सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काही येत असेल तर तो पदार्थ म्हणजे साबुदाणा. उपवासामध्ये बऱ्याचदा अन्य जेवणाचा त्याग करण्यात येतो आणि त्याऐवजी बऱ्याच ठिकाणा साबुदाण्याचे पदार्थ बनवून त्याचं सेवन करण्यात येतं. केवळ उपवासतच नाही तर अन्यवेळीही साबुदाण्याचा उपयोग तुम्ही खाण्यात करू शकता.

साबुदाण्याची खीर आणि खिचडी या साबुदाण्याच्या पदार्थाचा सर्वांनीच स्वाद घेतला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? उपवासाच्या दिवसात खाल्ला जाणारा हा साबुदाणा आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आपण या लेखातून साबुदाण्याचा फायदे, उपयोग आणि नुकसान काय होऊ शकतं ते पाहणार आहोत. पण त्याआधी नक्की साबुदाणा म्हणजे काय आणि त्याची पोषक तत्व काय आहेत ते पाहूया

प्रतीकात्मक चित्र

तुमची हाडं कमजोर असतील तर साबुदाणा तुमची हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतो. साबुदाण्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमची चांगलं प्रमाण असतं. एका बाजूला कॅल्शियम तुमच्या हाडांचा विकास करण्यास फायदेशीर ठरतं. तर दुसऱ्या बाजूला लोह ऑस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे विकार दूर करण्यासाठी मदत करतं. तसंच मॅग्नेशियम हाडांना तुटण्यापासून वाचवतं आणि अनेक समस्यांपासून लढण्यासाठीही शक्ती मिळवून देतं.

प्रतीकात्मक चित्र

तुम्ही अतिशय बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर साबुदाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. साबुदाण्याचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करून वजन वाढवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. साबुदाण्यात जास्त प्रमाणात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असतं.

कॅलरी आणि कार्बोहायड्रेटच्या दोन्हीच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते. कारण या दोन्ही गोष्टी शरीरातील उर्जा वाढवण्याचं काम करून फॅट वाढण्यासाठीही मदत करतात.

प्रतीकात्मक चित्र

साबुदाणा केवळ शरीरासाठी नाही तर आपल्या मेंदूसाठीही फायदेशीर ठरतो. यामध्ये मेंदूशी निगडीत असणाऱ्या अनेक त्रासातून सुटका मिळवण्याचे गुण असतात. यामध्ये फोलेटचं प्रमाण असतं. फोलेट हे प्रत्येक वयाच्या व्यक्तींच्या मेंदूसाठी फायदेशीर असते. हे मेंदूच्या विकारांसह इतर आजार दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तसंच मेंदूचा विकास होण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो.

प्रतीकात्मक चित्र

रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी साबुदाण्याचं सेवन करणं योग्य आहे. यामध्ये असणारं फोलेट तुमच्या रक्ताभिसरणाची प्रणाली सुदृढ करण्यासाठी सक्षम करतं. तसंच फोलेट अर्थात फोलिक अॅसिड हे रक्त वाहिन्यांना आराम देण्यासह रक्तप्रवाह अधिक सक्षम करतं. तुम्हाला कोणताही हृदयाचा त्रास असेल तर तो यामुळे कमी होतो. तसंच हृदयरोगापासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतं.

नेहमी थकवा, कमजोरी आणि छातीत कळ येत असेल तर हे एनिमियाचं लक्षण आहे. शरीरातील आढळणाऱ्या लाल पेशींची कमतरता आणि कमजोरीमुळे लोह कमी असल्याने एनिमिया आजार होतो. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला साबुदाण्याचा फायदा करून घेता येतो. साबुदाणा या आजारावर उत्तम उपाय आहे. साबुदाण्यात लोह जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आतड्यांना योग्य ऑक्सिजन मिळून पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम साबुदाणा करतो. यामुळे एनिमिया आणि यापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळते.

त्वचेसाठी अप्रतिम ठरतो साबुदाणा:-

जेव्हा आपण संपूर्ण आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या त्वचेकडे आपण कसं दुर्लक्ष करू शकतो. साबुदाणा आपल्या त्वचेसाठीही उत्तम ठरतो. यामध्ये जिंक, कॉप आणि सेलेनियमचं प्रमाण असतं. त्वचेसाठी या तिनही गोष्टी फायदेशीर असतात.

जिंक सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेची सुरक्षा करतं. तर कॉपरमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स गुण हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तसंच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे त्वचेचा कॅन्र होण्याची शक्यता असते त्यापासूनही साबुदाण्याच्या सेवनामुळे रक्षण होतं.


Posted

in

by

Tags: