काय आपल्याला पण वजन कमी करायचे आहे…तर प्रथम या गोष्टीवर ठेवावे लागेल आपल्याला लक्ष…तरच होऊ शकतो आपल्याला फायदा

1जर का तुम्ही भारतीय खाद्यपदार्थ योग्य पद्धतीनं बनवले तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. यामुळे तुमची बॉडी सहज शेपमध्ये आणू शकतो. खास गोष्ट ही आहे की, तुम्ही योग्य पद्धतीनं आपलं वजन कमी करू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या घरी बनणारी साधी डाळ सुद्धा तुम्हाा फिट बनवू शकते.

त्यामुळे लक्षात ठेवा की, घरातलं जेवण कधी चुकवू नका. होम मेड करीमध्ये आरोग्य आणि पोषक तत्त्व असतात. ताजी हंगामी भाज्यांचा इफेक्ट आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. केवळ हे बनवण्याच्या काही योग्य पद्धती जाणून घेतल्या पाहिजेत. या तुम्हांला तुमचं पोट बऱ्याच वेळेसाठी भरल्यासारखं वाटतं आणि यामुळे तुम्ही नको त्या स्नॅक्सपासून वाचता जे वजन वाढवण्याच कारण असतात. जाणून घेऊया की, भारतीय खाणं कसं आपलं वजन कमी करण्यासाठी बूस्ट करतात.

प्रतीकात्मक तस्वीर

भरपूर पाणी प्या :-

तुमचे संपूर्ण आरोग्य पाण्यावर अवलंबून असते. शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. डाएटमध्येही पाण्याचे महत्व आहे. कारण तुम्ही जितके पाणी प्याल तितके टॉक्झिक तुमच्या शरीरातून बाहेर पडेल. शिवाय पाणी प्यायलामुळे तुमचे पोट भरते आणि तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे खाण्याच्या योग्यवेळा वगळता तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही पाणी प्या. पोट कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्ही वाचले असतील तर तुम्हाला यामध्ये पाणी पिण्याचा सल्ला नक्की दिसेल.

प्रतीकात्मक तस्वीर

वजन वाढू न देता फिट रहाण्यासाठी तुम्ही डाएट चार्ट तयार करून त्याच्यानुसार अन्नपदार्थांचं सेवन करू शकता. तुमच्या खाण्याच्या वेळा आणि कॅलरीजचं प्रमाण साधारणपणे पुढीलप्रमाणे असावं…

सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान :

दोन पोळ्या किंवा ब्राऊन ब्रेडचे तीन स्लाइज, एक वाटी डाळ किंवा पालेभाजी, एक प्लेट सलाड (गाजर, मुळा, काकडी), साय काढलेलं दूध या पर्यायांपैकी एखादा निवडू शकता. तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थांचं सेवन करू शकता, पण मिठाईसारख्या जास्त कॅलरीजच्या पदार्थांचा समावेश करू नये.

मंचिंग (पन्नास ते शंभर कॅलरीज) : भाजलेले चणे-शेंगदाणे किंवा फायबरचं प्रमाण अधिक असलेल्या बिस्कीटांचं सेवन करू शकता. या वेळेत मंचिंग केल्यामुळे दुपारी कमी खाल्लं जातं.

दुपारी १ ते २ च्या दरम्यान :

दुपारी जेवताना एक-दोन पोळ्या किंवा एक ते दोन वाटी भात खाऊ शकता. एक वाटी आमटी किंवा डाळ (पाण्याचं प्रमाण जास्त असलेली), पालेभाजी (एक वाटी) आणि सलाड (१५० ते २०० ग्रॅम) याचाही दुपारच्या आहारात समावेश करू शकता.

रात्री ७.३० ते ८.३०च्या दरम्यान :

संध्याकाळी काहीतरी खाणं होतंच. त्यामुळे रात्री कमी खाल्लं जातं. रात्री जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायलं तर कमी खाल्लं जातं. एक पोळी, वरण, टोन्डमिल्क किंवा साय काढलेलं दूध यापैकी काहीही खाऊ शकता. गोड खायची इच्छा झाल्यास साधारण दोन ते पाच ग्रॅम गूळ खावा. यामधून तुम्हाला १० ते २० कॅलरीज मिळतील.

प्रतीकात्मक तस्वीर

व्यायाम:-

नुसत्या खाण्या पिण्याच्या सवयींवर तुमचे वजन असते असे नाही. तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे महत्वाचे असते. त्यामुळे या सात दिवसांमध्ये तुम्हाला व्यायामदेखील करायचा आहे. तुम्ही नेमका कोणता व्यायाम करणार आहात त्याचेही एक वेळापत्रक बनवून घ्या वजन कमी करण्यासाठी योगासने सुद्धा आहेत ती तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता.

प्रतीकात्मक तस्वीर

मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचं कमीतकमी सेवन करा. तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळू नका, पण अतिरेक टाळा. तसेच शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी उठल्यावर किंवा फ्रेश झाल्यानंतर लगेच कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून त्याचं सेवन करा. पाण्यामध्ये दालचिनीचा छोटा तुकडा, एक चमचा ओवा किंवा एक चमचा हळद घालून ते पाणीसुद्धा पिऊ शकता. असं केल्यानं तुमच्या शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर पडून चरबी कमी होण्यास मदत होईल. वजन वाढू न देण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही खास व्यायामासाठी काही वेळ राखून ठेवायला हवा.


Posted

in

by

Tags: