जर आपण पण करत असाल सोयाबीनचे सेवन तर व्हा सावधान…या लोकांसाठी सोयाबीन ठरू शकते घातक शिवाय त्याच्या लैगिक आयुष्यावर होऊ शकतो परिणाम

सोयाबीनला प्रोटीनयुक्त आहार मानला जातो. सोयाबीनच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. प्रोटीनचा उत्तम सोर्स म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. सोयाबीन मध्ये लॅक्टोज नसल्याने ते नीट पचते. या कारणामुळेच अनेक बेबी फूड्समध्ये सोयाबीनचा वापर होतो. सोयाबीनमध्ये लेसीथिन असते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते.
सोयाबीनच्या नियमित सेवनाने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. सोयाबीनच्या सेवनाने शरीरात अॅस्ट्रोजन निर्माण होते जे सुरकुत्या दूर कऱण्यास मदत करते. केस लांब, घनदाट वा काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात. उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे पिंपल्सना निमंत्रण मिळते. तुम्हालाही ही समस्या आहे तर सोयाबीनचा खाण्यात समावेश करा.
तसेच एका अभ्यासात असेही सांगितले आहे की, सोयाबीनमध्ये आईसोफ्लेवोंस नावाचे एक रसायन असतं. हे रसायन इस्ट्रोजन हार्मोन सारखं असतं. महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते.
सोयाबीनचे फायदे शोधण्यासाठी संशोधकांनी सुमारे २०० महिलांवर प्रयोग केले. या २०० महिलांना सहा महिन्यांपर्यंत सोयाबीन प्रोटीनयुक्त आहार दिला. त्यानंतर संशोधकांनी या महिलांच्या हाडांचे संशोधन केल्यास त्यांच्या हाडांमधे अधिक भक्कमपणा व नेहमीच्या तूलनेत अधी निरोगीपणा दिसून आला.
सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे कमकुवत होण्याची समस्याही दूर होते. सोयाबीन खाल्ल्याने नखांना मजबूती मिळते तसेच नखे चमकदार होतात. सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा. त्यानंतर याचे बारीक मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
उच्च कोलेस्ट्रॉल:- सोयाबीनच्या उच्च कोलेस्ट्रॉलच्या परिणामावरील बहुतेक अभ्यासांमधे असे निष्कर्ष आहेत की सोयाबीनमध्ये आढळणारे प्रथिने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल कमी करतात. सर्वांच्या मते,
सोयाबीन आणि इतर सोया उत्पादने उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये समान सकारात्मक परिणाम देऊ शकत नाहीत. या भिन्नतेचे कारण म्हणजे लोकांच्या आतड्यांमधे आढळणार्या जीवाणूंची संख्या आणि सोयाचे कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक पचन करण्यासाठी वापरली जातात.
हृदय आरोग्य:- सोयाबीन थोडी चरबी देतात, परंतु ते आपल्याला संतृप्त चरबीयुक्त आहार देत नाहीत. सोयाबीन एक निरोगी, असंतृप्त चरबीचा स्त्रोत आहे ज्यामुळे आपल्याला आपले एकूण कोलेस्ट्रॉल कमी होते. हे आपल्याला अॅथेरोस्क्लेरोसिससारख्या परिस्थितीस प्रतिबंध करण्यास अनुमती देऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सहज होऊ शकतात. तसेच,
निरोगी प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट फॅटी एसिडस् देखील आहेत. यातील दोन फॅटी एसिड आहेत लिनोलिक एसिड आणि लिनोलेनिक एसिड. सोयाबीनच्या महत्त्वपूर्ण प्रमाणात उपस्थित असलेले हे दोन फॅटी एसिड शरीरात गुळगुळीत स्नायूंचे कार्य नियमित करतात आणि रक्तदाब योग्य पातळी राखण्यास मदत करतात.
सोयाबीन प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे. सोयाबीन असा पदार्थ आहे ज्याला भात किंवा रोटी-चपातीसोबत खाल्ले जाऊ शकते. अनेक लोक याला नाष्टा म्हणूनही खाणे पसंद करतात. सोयाबीन निश्चितच प्रोटीनचा एक मुख्य आणि प्रमुख स्रोत आहे, पण सोयाबीनचे जास्त सेवन आरोग्यसाठी हानीकारण ठरु शकते. त्यामुळे काही लोकांनी सोयाबीनपासून दूर राहिलेलं बरं.
सोयाबीनचे नुकसान पुढील प्रमाणे-
– सोयाबीन खाण्याचा मुख्य धोका म्हणजे याच्या जास्तीच्या सेवनामुळे अॅलर्जीची समस्या जाणवू शकते. त्यामुळे सोयाबीन खाल्यानंतर अॅलर्जी जाणवत असल्यास याचे सेवन बंद करा.
– सोयाबीन खाल्याने महिलांमध्ये हॉर्मोनसंबंधी अनेक समस्या जाणवू शकतात. सोयाबीनमध्ये असलेले कम्पाऊंट फीमेल हॉर्मोन अॅस्ट्रोजनची नकल करतात. त्यामुळे महिलांनी याचे अधिक प्रमाणात सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
– मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे सेवन केल्यामुळे पुरुषांमधील स्पर्मच्या संख्येमध्ये कमतरता येते. त्यामुळे मर्यादीत प्रमाणात सोयाबीन खाण्याचा सल्ला दिला जातो.
सोयाबीनमध्ये असलेले ट्रान्स फॅट लठ्ठपणा वाढवते. तसेच यामुळे कॉलेस्ट्रालही वाढते.
-हृदयासंबंधी काही आजार असल्यास चुकुनही सोयाबीन खाऊ नका. हृद्यासंबंधी आजार असलेल्या लोकांना सोयाबीन न खाण्याचा सल्ला दिला जातो.
-याशिवाय ज्या लोकांमध्ये मायग्रेनची समस्या आहे, तसेच ज्यांना शरीर फुगणारा थायरॉईड आहे अशांनी सोयाबीन खाऊ नये. अशाप्रकारचा आजार असलेल्या लोकांना सोयाबीनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.