कोरोनाची आणखी ३ लक्षणे आली समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका…अन्यथा द्याल मृत्यूला तोंड

जगभरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून एक कोटींहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हाने वाढत आहेत. त्यातच आता अमेरिकेच्या ‘सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन’ने करोनाची तीन लक्षणे सांगितले.

याआधी सुका खोकला, ताप, थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आधी लक्षणे करोनाबाधितांची असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ‘सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन’ने करोनाची आणखी तीन लक्षणे सांगितली आहेत.

यामध्ये नाक सतत वाहणे, अतिसार आणि उलटी ही लक्षणे करोनाच्या आजाराची असू शकतात. या आजारांना सामान्य आजार न समजण्याचा सल्ला ‘सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन’ने (सीडीसी) दिला आहे.

‘सीडीसी’ नुसार, नाक सतत वाहणे हे करोनाच्या लक्षणात आढळले नव्हते. त्याशिवाय सतत नाक वाहत असेल आणि अस्वस्थ वाटत असेल तर त्या व्यक्तीला करोनाची बाधा असण्याची शक्यता आहे. काही करोनाबााधित रुग्णांमध्ये ही,

लक्षणे आढळली असल्याचे समोर आले असल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे. करोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसत असल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीला अतिसाराचा त्रास होत असल्यास त्याला कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता आहे.

अशा व्यक्तीची तातडीने करोना चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे. त्याशिवाय सतत मळमळल्यासारखे वाटणे हे लक्षणंदेखील करोनाचे लक्षण असल्याचे सीडीसीने म्हटले आहे. सतत मळमळल्यासारखे वाटणे हे सामान्य लक्षण नसल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले आहे. ही लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने तातडीने आयसोलेशनमध्ये जाण्याची आवश्यकता असल्याचे ‘सीडीसी’ने म्हटले.

त्याशिवाय, सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशननुसार थंडी वाजणे, कफ होणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवणे, अंगदुखी, डोके दुखी होणे, चव न जाणवणे आदी लक्षणे आढळल्यास करोनाची लक्षणे समजून चाचणी करायला हवी असे ‘सीडीसी’ने म्हटले आहे.

सीडीसी म्हणते की कोरोना विषाणू ग्रस्त असणाऱ्या लोकांना थंडी वाजू शकते. इनफेक्शन झाल्यावर ज्या प्रमाणे थंडी वाजून येते त्याप्रमाणेच याचे देखील लक्षण आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, सर्दीसह, थंडी वाजून येणे किंवा घट्टपणा यासारखे लक्षणे देखील दिसू शकतात. थंडीमुळे रुग्णाचे शरीर थंड होऊ लागते. सीडीसीने सूचीबद्ध केलेल्या नवीन लक्षणांमध्ये स्नायू वेदनांचे वर्णन केले आहे. सांधेदुखी देखील कोरोनाचे लक्षण असू शकते.

कोरोना-संक्रमित व्यक्तीच्या शरीराचे चौथे लक्षण तीव्र डोकेदुखी म्हणून वर्णन केले आहे. चीन आणि अमेरिकेत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये तीव्र डोकेदुखीची समस्या दिसून आली.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार कोरोना संक्रमित व्यक्तीला घश्यात त्रास होऊ शकतो. आतापर्यंत, घसा दुखणे आणि सूज येणे ही समस्या देखील बर्‍याच रुग्णांमध्ये दिसून आली.

सीडीसीने आपल्या अहवालात असा दावा केला आहे की कोरोना रुग्णाची जिभ बेचव होऊन जाते. कोरोनाची लागण झाल्यास जिभेने चव ओळखण्याची शक्ती लोकं गमावतात.


Posted

in

by

Tags: