जाणून घ्या नवजात बाळाला कोणकोणते डोस कधी आणि केव्हा दिले पाहिजेत…नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते आपल्या बाळाचे

लहान बाळाचं आपल्या घरात आगमन झालं की, पुढची काही वर्षं संपूर्ण कुटुंबाचं विश्व त्या बाळाभोवतीच फिरतं असत. आपल्या बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळाला कपडे कोणते घालावेत, त्याला पौष्टिक असे कोणते पदार्थ खायला द्यावेत, अशा विविध गोष्टींची चाचणी सुरू होते.

बाळाची काळजी घेण्याच्या या काळात बाळाच्या आई-बाबांनी आणखी एक काम लक्षात ठेवून करायचं असतं. ते म्हणजे बाळाचं लसीकरण. बाळांच्या लसीकरणाचा तक्ता हा बालरोगतज्ज्ञ त्या बाळाच्या पालकांना देतातच. या लशी कोणत्या आहेत त्याची आपण आज ओळख करून घेऊया.

जन्म के बाद बच्चे को हेपेटाइटिस बी वैक्सीन लगाई जाती है- सांकेतिक तस्वीर

हेपेटाइटिस ए:-हिपेटायटिस ‘ए’ ही विषाणूजन्य कावीळ आहे. त्यापासून बचाव करण्यासाठीची लस मूल एक वर्षाचं झाल्यावर दिली जाते आणि त्यानंतर सहा महिन्यांनी या लशीचा दुसरा डोस दिला जातो.

बच्चों को पोलियो की खतरनाक बीमारी से सुरक्षित रखने के लिए पोलियो वैक्सीन दी जाती है- सांकेतिक तस्वीर

पोलिओ:-आता याबद्दल तुम्हाला वेगळं काय सांगणार, पोलिओची लस सगळ्यांनाच माहीत आहे. पोलिओ हा आजार बाळाला शारिरीकदृष्ट्या अपंग बनवू शकतो. त्यामुळे अजिबात न चुकता ठरलेले सगळे डोस दर महिन्याला बाळाला द्यावे. सामान्यत: बाळाला पोलिओचे चार डोस दिले जातात. पहिला डोस हा बाळ दोन महिन्यांचे झाल्यावर दिला जातो.

दुसरा डोस बाळ चार महिन्यांचे झाल्यावर देतात. तिसरा डोस हा ६ ते १८ महिन्यांच्या दरम्यान बाळाला दिला जातो आणि चौथा व शेवटचा डोस बाळ ४ ते ६ वर्षांचे झाल्यावर देतात. यातील एकही डोस न चुकवणे बाळाच्या भल्याचे असते. तर मंडळी या आहेत काही महत्त्वाच्या लसी ज्यांचे एकही डोस तुम्ही अजिबात चुकवू नका. याशिवाय इतरही महत्त्वपूर्ण लसी बाळाला वेळेवर देत राहा.

बच्चों को एक से दो साल के बीच में हेपेटाइटिस ए वैक्सीन लगाई जाती है- सांकेतिक तस्वीर

हेपेटाइटिस बी:-हेपेटाइटिस बी ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची लस असून याचा पहिला डोस अजिबात चुकवू नये. बाळाला या लसीचे ३ ते ४ डोस दिले पाहिजेत. पण ही लस कोणत्या ब्रांडची आहे ते मात्र तपासून घ्यावे.

चांगली गुणवत्ता असेल तर जास्त डोस घेण्याची गरज नाही. पण अशावेळी आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहिला डोस बाळ जन्माला आल्यावरच दिला जातो. दुसरा डोस हा बाळ १ किंवा २ महिन्याचे झाल्यावर दिला जातो. तिसरा डोस गरज भासली तर चौथ्या महिन्यात देतात आणि शेवटचा डोस ६ ते १८ महिन्यांदरम्यान बाळाला दिला जातो.

शिशु को खसरा और रूबैला जैसी बीमारियों से सुरक्षित रखने के लिए एमएमआर वैक्सीन लगाई जाती है- सांकेतिक तस्वीर

एमएमआर लस:-एमएमआर लस’ म्हणजे गोव, गालगुंड आणि रुबेला या तीन आजारांवरील प्रतिबंधक लस. बाळ नऊ महिन्यांचं झाल्यावर या लशीचा पहिला डोस देतात. तसंच १५ महिन्यांचं झाल्यावर दुसरा व चार ते पाच वर्षं वयाच्या दरम्यान ‘एमएमआर’चा तिसरा डोस दिला जातो. यापैकी गोवर लहान मुलांसाठी प्रसंगी गंभीर स्वरूपाचा आजार ठरू शकतो. त्यामुळे या लशीचं महत्त्व मोठं आहे.

शिशु को स्वस्थ और बीमारियों से दूर रखने के लिए वैक्सीन लगाना बहुत जरूरी होता है- सांकेतिक तस्वीर

डीपीटी वैक्सीन:-आता ‘डीपीटी’ लशीला ‘पेंटाव्हॅलंट’ (पंचगुणी) लशीचा पर्याय आला आहे. ‘पेंटाव्हॅलंट’ लशीत ‘डीपीटी’ लशीतील सर्व गुण असतातच शिवाय त्यात विषाणूजन्य कावीळ (हिपॅटायटिस- बी) आणि एन्फ्लूएन्झा ताप (हिमोफिलिस एन्फ्लूएन्झा-बी अर्थात ‘हिब’) या आजारांविरोधातही रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याची शक्ती असते.


Posted

in

by

Tags: