बॉलीवूडमध्ये गाजलेल्या या खलनायकांची मुले करत आहेत आज अशा प्रकारची कामे…जाणून आपल्याला सुद्धा

बॉलीवूड चित्रपटांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा केवळ अभिनेता-अभिनेत्री यांचीच स्तुती करतो, पण त्या चित्रपटात जो हिरो असतो त्याला हिरो बनवण्यात त्या चित्रपटातील खलनायकांचा देखील तेवढाच हात असतो.

एक प्रकारे, नायकांपेक्षा खलनायकाला जास्त महत्त्व आहे. खलनायक जितका सामर्थ्यवान असेल तितकाच नायक, हिरो देखील तितकाच सामर्थ्यवान असतो. तसेच नायकाआधी खलनायकाला कास्ट केले जाते यावरून आपल्याला लक्षात येईल कि खलनायकाची भूमिका किती महत्वाची असते.

आपल्याला अग्निपथमधील संजय दत्तचा लुक आठवत असेलच, अर्थात या चित्रपटामध्ये नायकापेक्षा जास्त चर्चा झाली ती म्हणजे खलनायकाची

.

तसेच आपल्या चित्रपट सृष्टीला असे अनेक खलनायक मिळाले आहेत, ज्यांचे अभिनय आपल्या आजही लक्षात आहेत. पण आपण नेहमी नायकांच्या मुलांबद्दल बोलत असतो, की या हिरोचा मुलगा,मुलगी काय करते आहे ते कधी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत याबद्दल, पण आपण कधीच या खलनायकांच्या मुलांबद्दल फारसं बोलत नाही.पण आज आपण अशाच नावाजलेल्या ११ खलनायकांच्या मुलांबद्दल जाणून घेणार आहोत.

अमरीश पुरी आणि राजीव पुरी:-

अमरीश पुरी हे बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी खलनायकांपैकी एक आहेत. प्रत्येक चित्रपटामधील अमरीश पुरीची व्यक्तिरेखा लक्षात राहण्यासारखी होती. तसेच एक काळ असा होता की प्रत्येक निर्मात्याला खलनायक म्हणून अमरीश पुरी असावा अशी इच्छा असायची.

तसेच त्यांनी जवळजवळ सर्व प्रमुख कलाकारांसोबत काम केले आहे. अमरीश पुरी यांनी खलनायकाखेरीज चित्रपटांमध्ये बरीच वेगवेगळी पात्रे साकारली आहेत. पण त्याचवेळी त्याचा मुलगा राजीव पुरी याने कधीही चित्रपटांमध्ये रस दाखविला नाही आणि तो आज एक मारिन नेव्हिगेटर आहे.

एमबी शेट्टी आणि रोहित शेट्टी:-

एम.बी. शेट्टी हे आपल्या काळातील प्रसिद्ध स्टंट मॅन होते आणि त्यावेळी त्याचे नाव स्टंटसाठी ओळखले जायचे. आणि तेव्हापासून त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारायला सुरुवात केली. पण आपणास जाणून आश्यर्य वाटेल कि विलन एम.बी शेट्टी यांचा मुलगा हा सध्या बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डायरेक्ट-प्रोड्युसर पैकी एक आहे. तो आणखी कोणी नसून आपला रोहित शेट्टी आहे.

गुलशन ग्रोव्हर आणि संजय:-

बॅडमॅन गुलशन ग्रोव्हर हे देखील बॉलीवूडच्या प्रसिद्ध विलन्सपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळेच स्थान बनवले आहे. पण त्यांच्या मुलाला संजय ग्रोव्हरला चित्रपटांत काही रस नाही, तो एक बिसनेस मॅन आहे. तो आता त्याचा व्यवसाय पाहतो आहे.

कबीर बेदी आणि अ‍ॅडम बेदी

बॉलीवूडच्या सर्वात हंडसम विलन्सपैकी एक कबीर बेदी यांनी बॉलीवूडला अनेक अविस्मरणीय भूमिका दिल्या आहेत. 1983 साली त्यांनी अशा एका सिनेमात काम केलं जे भल्या भल्या अ‍ॅक्टर्सचं स्वप्न असतं. कबीर बेदी जेम्स बॉन्ड सीरिजचा 13 वा सिनेमा ऑक्टोपसी मध्ये दिसले होते. यात त्यांनी एका शीख व्यक्तीची भूमिका साकारली होती. तर कबीर बेदी यांचा मुलगा आदम बेदी हा एक इंटरनॅशनल मॉडेल आहे.

अमजद खान आणि शादाब खान

शोले’चा गब्बर सिंग म्हणजेच आपले अमजद खान, यांचा तो रोल तर कदाचितच कोणी विसरू शकेल. त्यांची त्यांच्या अभिनयाने गब्बर सिंगचा रोल अविस्मरणीय बनवला. आपल्या वडिलांप्रमाणे शादाब खान यांना देखील चित्रपटांत आपलं करिअर बनवायचं होतं पण त्यात ते काही यशस्वी झाले नाही.

दिलीप ताहिल आणि ध्रुव ताहिल या

चित्रपटात जर एखाद्या प्रेमाला तोडण्याची गोष्ट असेल तर तेव्हा खलनायक दलीप ताहिल याचे नाव पहिला येते. दलीप ताहिल याना ‘बाजीगर’, ‘राजा’, ‘इश्क’, ‘कयामत से कामयात’ मधील खलनायक म्हणून ओळखले जाते. तर दिलीप याचा मुलगा ध्रुव ताहिल हा लंडनमध्ये एक मॉडेल आहे.


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *