ब्लडप्रेशरला आता आपण झटक्यात कमी करू शकता तसेच कंट्रोल मध्ये ठेवू शकता…फक्त करा या उपायाचे पालन…परिणाम आपल्या आपल्या समोर असतील

रक्तदाब हि एक सामान्य समस्या असून अनेकांना हा त्रास भोगावा लागतो. रक्तदाबाचे दोन प्रकार असतात एक असतो हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब आणि दुसरा असतो लो ब्लड प्रेशर अर्थात कमी रक्तदाब!

काहींना उच्च रक्तदाबाला सामोरे जावे लागते तर काहींना कमी रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागतो. उच्च रक्तदाबाची समस्या मद्यपान, धुम्रपान आणि मीठ जास्त खाल्ल्याने उद्भवते तर कमी रक्तदाबाची समस्या आपल्या आहाराशी निगडीत असते.

आहार संतुलित नसलेल्या व्यक्तींमध्ये कमी रक्तदाबाची समस्या मोठे प्रमाणावर दिसून येते. कमी रक्तदाबामुळे कधी कधी रुग्ण बेशुद्ध होऊन कोसळतो.

एक चांगली गोष्ट म्हणजे कमी रक्त दाबाची समस्या हि घरगुती उपचार करून सुद्धा नियंत्रणात आणता येते. आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत की असे कोणते घरगुती उपाय आहेत जे केल्याने आपण कमी रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो.

प्रतीकात्मक चित्र

काळी मिरी आपल्याला उच्च रक्तदाब समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. आयुर्वेदिक चिकित्सकांच्या मते, जेव्हा ब्लड प्रेशर अचानक वाढू लागतो, तेव्हा अर्धा ग्लास पाण्यात काळी मिरी मिसळून त्याचे सेवन केल्यास आपल्याला आराम मिळू शकतो.

ज्या लोकांना या प्रकारची समस्या आहे, त्यांनी आपल्या जेवणात काळ्या मिरीचा समावेश केला पाहिजे. असे केल्याने पाचन तंत्र मजबूत होते. त्याशिवाय दातदुखी, डोळ्यांची दृष्टी वाढविणे, शरीरातून सूज कमी करणे यासारख्या अनेक गोष्टींमध्ये काळी मिरी देखील मदत करते

प्रतीकात्मक चित्र

आहारातून कांद्याच्या नियमीत सेवनाने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. यात क्योरसेटिन आढळतं. हा एक असा ऑक्सिडेंट आहे ज्याने हृदयरोगांचा धोका कमी होतो. कांद्याचे सेवन केल्यास रक्तदाब त्वरित कमी होतो. म्हणून कांद्याचे सेवन करणे चांगले.

प्रतीकात्मक चित्र

लसणामध्ये एलिसीन असतं, जे नायट्रिक ऑक्साइडचं उप्तादन वाढवतं. आणि याने मांसपेशींना आरामही मिळतो. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी रोज लसणाची एक कळी खावी.

प्रतीकात्मक चित्र

आवळा

आवळा अनेक आजारांवर रामबाण उपाय मानला जातो. आवळा ब्लड प्रेशरच्या समस्याही दूर करण्यास फायदेशीर आहे. याने ब्लड सर्कुलेशन चांगलं राहतं. आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं.

मुळा

मूळा खाल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. मुळा तुम्ही शिरवून किंवा कच्चाही खाऊ शकता. याने शरीराला मिनरल्स आणि पोटॅशिअम मिळतं.

वेलची

जाणकारांनुसार, वेलचीच्या नियमीत सेवनाने ब्लड प्रेशर योग्यप्रकारे काम करतं. याने शरीराला अॅंटीऑक्सिडेंट मिळतात. तसेच ब्लड सर्कुलेशनही योग्य राहतं.

लिंबू आणि मीठ

मिठाचं जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. परंतु हेच मीठ आश्चर्यकारकरित्या कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना लाभदायी ठरू शकते. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि एक दोन चिमुटभर मीठ त्यात मिसळून दिवसातून किमान तीन वेळा सेवन करावे.

हा उपाय केल्यास कमी रक्तदाबामुळे निर्माण झालेली शारीरिक स्थिती पूर्ववत होण्यास मोठी मदत मिळते. त्यामुळे कधी रक्तदाबाचा अधिक त्रास झाल्यास आवर्जून हा उपाय करून पहा आणि रक्तदाब पूर्ववत करा.

ताक:-

जेवून झाल्यावर ताक आवर्जून प्यावे, ही गोष्ट आयुर्वेदात सांगितली आहे. हि गोष्ट कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लागू होते. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दिवसातून किमान २ वेळा तरी न विसरता ताक प्यावे.

यात असलेले चांगले बॅक्टेरिया रक्ताभिसरण प्रक्रिया संतुलित राखण्यास मोठी मदत करतात. हि प्रक्रिया संतुलित राहिल्याने कमी रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल आणि तुम्ही ताक पीत नसाल तर तुम्ही आवर्जून त्याचे सेवन सुरु करा.


Posted

in

by

Tags: