5 हजार करोडच्या अलिशान घरात राहतात अनिल अंबानी, एका महिन्याचे वीज बिल येते तब्बल 60 लाख, बघा त्यांच्या घराचे फोटोज…

अनिल अंबानी यांच्यावर सध्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे आणि त्यांच्यावर लंडनच्या कोर्टात खटलाही चालला आहे. अनिल अंबानी यांनी अनेक चिनी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि आता ते,

हे कर्ज परत करण्यास असमर्थ आहेत. एका अहवालानुसार, चीनची एक्सपोर्ट एंड इम्पोर्ट बँक ऑफ चाइना आणि डेव्हलपमेंट बँक ऑफ चाइनाकडून अनिल अंबानीवर $ 716 दशलक्ष म्हणजे सुमारे 5,276 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि तेच कर्ज या बँकांनी दाखल केले आहे.

लंडन कोर्टाने त्यांना कर्ज फेडण्यासाठी जूनपर्यंत मुदत दिली आहे. पण यात ते परत करण्यात अपयशी झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही शिल्लक नसल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले असून ते दागिने विकून वकीलांची फी भरत आहेत. पण अनिल अंबानी ज्या घरात राहतात त्या घराची किंमत 5 हजार कोटींपेक्षा जास्त आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय त्यांचे घर त्यांच्या कर्जापेक्षा अधिक मौल्यवान आहे.

अनिल अंबानी यांचे हे घर मुंबईत असून या घरात फक्त चार लोक राहतात. या घरात अनिल, टीना मुनिम आणि त्यांची दोन मुलं अनमोल आणि अंशुल अंबानी राहतात.

धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी हे घर अतिशय अलिशान बनवले आहे. 2018 मध्ये, आयआयएफएल या वित्तीय सेवा कंपनीने त्यांच्या या घराला भारताच्या सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसरे स्थान दिले. तर त्यांचा भाऊ मुकेश अंबानी यांच्या घराला या यादीत प्रथम स्थान मिळाला आहे.

अनिल अंबानीच्या घरात असलेल्या डेकोरेशन सामानाची किंमत कोटींची आहे. त्याने परदेशातील इंटिरियर डिझायनर्सनी आपले घर सजविले आहे.

त्याने मुंबईतील पाली हिल भागात आपला बंगला बनविला आहे. अनिल अंबानी यांचे घर १६०० स्क्वेअर फूट मध्ये बांधलेले आहे आणि घरात जिम, स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत.

त्याने आपल्या घराच्या छतावर हेलिपॅडही बांधले आहे. असे म्हणतात की हे घर उंच करायचे होते. परंतु त्यांना तसे करण्यास अधिकऱ्यांची परवानगी मिळाली नाही.

त्यांच्या घरात बरेच हॉल आहेत आणि त्यांची अतिशय सुंदर सजावट केलेली आहेत. अनिल अंबानी यांच्या या घराच्या देखभालीचा खर्चही खूप जास्त आहे. या घरात त्यांचे डझनभर कर्मचारी आहेत. ज्यांना दरमहा लाखो मध्ये पगार दिले जातात.

असे म्हणतात की त्यांच्या या घराचे विजेचे बिल महिना 60 लाख रुपयांपर्यंत येते. त्याचवेळी जेव्हा त्यांच्या घराच्या खर्चाचा मुद्दा कोर्टात उपस्थित झाला तेव्हा त्यांनी कोर्टात सांगितले की पत्नी आपल्या घराचा खर्च बघत असते. हा खर्च मी बघत नाही असे त्यांनी कोर्टात सांगितले.


Posted

in

by

Tags: