आता घरात अगरबत्ती जाळणंही ठरू शकतं आरोग्याला धोकादायक…सत्य आले समोर अगरबत्तीमुळे होऊ शकतात हे गंभीर रोग…त्वरित व्हा सावध अन्यथा

घरात देवासमोर अगोदर दिवा आणि अगरबत्ती लावून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर थोडा वेळ थांबा आणि विचार करा… अगरबत्तीचा सुवास तुमच्या घरात दरवळत असेल पण, कदाचित हीच अगरबत्ती तुमच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते.

प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घरात अगरबत्त्या जाळल्या तर त्यांचा धूर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. पाहुयात… कसा परिणाम होतो या अगरबत्त्यांचा तुमच्या आरोग्यावर…

श्वास घेण्यास त्रास होणे:-
उद्बत्तीचा धूर असह्य झाल्यास अनेकदा काही जण सतत शिंकताना किंवा खोकताना तुम्ही पाहिलं असेल… बाजारात स्वस्त मिळतात म्हणून घरात अगरबत्त्या आणून जाळल्या तर त्यांमध्ये असलेलं कार्बन मोनोक्साईड घरात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींचे नुकसान होऊन श्वसनाचे विकार जडण्याची शक्यता असते.

अस्थमाचा त्रास होतो:-
जळणार्‍या अगरबत्तीमधून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन अशी प्रदूषक श्वासनलिकेच्या मार्फत तुमच्या फुफ्फुसात जातात… सतत असा दूर श्वासनलिकेतून फुफ्फुसात गेल्यास अस्थमाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही रुग्णांमध्ये अगरबत्तीचा धूर सिगारेटइतकाच त्रासदायक असतो.

त्वचा विकार जडण्याची शक्यता:-
दीर्घकाळ अगरबत्तीचा धूर श्वसनाच्या मार्गातून फुफ्फुसात गेल्यास त्वचेसोबतच डोळेदेखील चुरचुरण्याची शक्यता लहान मुलांमध्ये व वयोवृद्धांमध्ये आढळते. सरोज सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सचे प्रमुख त्वचारोगतज्ञ डॉ. अनील गांजो यांच्या मते, अगरबत्तीमुळे नाक, पापण्या अशा नाजूक त्वचा असलेल्या भागांवर अ‍ॅलर्जी दिसण्याची शक्यता अधिक असते. अगरबत्तीच्या धूरामुळे अशा ठिकाणि खाज येणे, अ‍ॅलर्जी उठणे दिसून येते.

मज्जासंस्थेचे कार्य बिघडते:-
अगरबत्तीच्या धुराचा तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, एकाग्रता न होणे, विसरभोळेपणा वाढणे अशा समस्या  वाढतात. अगरबत्तीमुळे घरात प्रदूषण वाढते.अनेक घातक प्रदूषकांमुळे मेंदूचे कार्य प्रभावित होण्याची शक्यता असते.

श्वसनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते:-
अगरबत्तीमुळे कर्करोग होऊ शकतो. हा विचार तुम्ही केलात का? जर्नल ऑफ अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, दीर्घकाळ अगरबत्तीच्या धुरात राहिल्यास अप्पर रेस्परेटरी ट्रॅकचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक बळावते.

शरीरात विषारी घटकांचा समावेश होण्याची शक्यता वाढते
अगरबत्ती जाळल्यानंतर त्यातून विषारी धूर बाहेर पडतो. ज्यामध्ये लेड, आयर्न, मॅग्नॅशियम अशा विषारी घटकांचा समावेश असतो. अशा घटकांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास त्याचा किडनीवर भार येतो. परिणामी किडनीचे विकार वाढतात. अगरबत्तीच्या धूरामुळे रक्तातील इम्प्युरिटिज वाढण्याची शक्यता आहे.

हृद्याची कार्यक्षमता कमी होणं
अगरबत्तीचा तुमच्या हृदयावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. कारण अगरबत्तीच्या धूरातून बाहेर पडणारे घटक रक्तवाहिन्यांना अपायकारक ठरू शकतात. यामुळे रक्त प्रवाहामध्ये अडथळा येण्याची, दाह निर्माण होण्याची शक्यता वाढते.


Posted

in

by

Tags: